Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांच्या डोक्यातं काय चाललंय, मला काय देणेघेणं; चव्हाणांनी राऊतांची हवाच काढली

Ashok Chavan On Sharad Pawar : शरद पवारांच्या डोक्यातले कळायला देवेंद्र फडणवीस यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यावर आता भाजप नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांनी खोचक टोला लगावला.

शरद पवारांच्या डोक्यातं काय चाललंय, त्याच्याशी आम्हाला काय देणं-घेणं आहे. आम्हाला लोकांच्या मताशी अन् कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असे म्हणत चव्हाण यांनी राऊतांसह शरद पवारांची हवाच काढून घेतल्याची चर्चा रंगली आहे. जालन्यातील परतूर येथे भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अशोक चव्हाण म्हणाले की, आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही. कोणाचं आरक्षण काढून घेणे एवढे सोप नाही. मनोज जरागेंचे अनेक गैरसमज दूर केले आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबर मध्ये मतदान होईल असा अंदाज आहे.

Ashok Chavan Sharad Pawar

आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही

कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही, मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू असून त्यांचे अनेक गैरसमज दूर झालेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असा अंदाज देखील अशोक चव्हाण यांनी वर्तवला आहे.

मराठवाड्यातील काही लोकांशी चर्चा

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, माझी आणि बावनकुळे साहेबांची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की, मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय मानसिकता आहे. त्या भागातील लोकांचं काय मत आहे. हे मी जाणतो समजतो. मला परतूर मतदारसंघामध्ये जाण्यास आवडेल, असं मी बावनकुळ यांना आवर्जुन सांगितलं.

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार या चर्चा सुरू आहेत, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांच्या डोक्यात तीन, चार नावे आहेत. पण उद्धव ठाकरे यांचे नाव नाही'. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. शरद पवारांच्या मनात काय सुरू आहे, हे समजण्यासाठी फडणवीसांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर देत पवारांची हवाच काढून टाकल्याची चर्चा सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+