Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न

Ashadhi Ekadashi 2024 : टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशी आहे. यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला.

Cm Eknath Shinde

अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. सर्व वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात. आज तो दिवस उजाडला असून गेल्या काही अनेक दिवसांपासून दिंड्या-पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे.

बळीराजा सुखी होऊ दे मुख्यमंत्र्याचं विठ्ठरायाला साकडं

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी होते. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.

लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

आज लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत. पंढरी नगरीत जवळपास 11 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. आज ही संख्या दुप्पट झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी भरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+