तणावाच्या पार्श्वभूमीवर ओवेसींच्या अहिल्यानगर सभेला परवानगी मिळाली: पण 'या' 12 कठोर लागू!
Asaduddin Owaisi News : एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या आज अहिल्यानगर येथील सभेला अखेर पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे.
मात्र, शहरात काल (दि. २९) निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेत १२ कठोर अटी आणि शर्ती लादल्या आहेत. मुकुंदनगर भागात ही सभा होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ आल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

तणावपूर्ण पार्श्वभूमी आणि पोलीस कारवाई
ओवैसींच्या सभेपूर्वी, सोमवारी (दि. २९) अहिल्यानगरमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान रांगोळी काढण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर दंगलसदृश्य परिस्थितीत झाले.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोठला परिसरात रांगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ आंदोलन हिंसक झाले. जमावाने दगडफेक केली, ज्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले.
जखमी आणि गुन्हे
या घटनेत सात पोलीस कर्मचारी आणि एक महिला होमगार्ड जखमी झाले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटक आणि तपास
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे तपास सुरू केला असून, आतापर्यंत ३९ जणांना ताब्यात घेतले आहे.
या गंभीर घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. याच संवेदनशील परिस्थितीत ओवैसींच्या सभेला सशर्त परवानगी मिळाली आहे.
ओवैसींच्या सभेसाठी पोलिसांच्या १२ अटी कोणत्या?
अहिल्यानगरमधील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर खालील प्रमुख १२ अटी आणि शर्तींचे बंधन घातले आहे:
स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी
सभेसाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या (स्टेज, मंडप, पाकींग, अग्निशमन, आरोग्य इ.) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेऊन मंजुरीपत्र सादर करणे बंधनकारक.
- सुरळीत पार्किंग आणि वाहतूक
फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक वाहनांच्या ये-जा करण्यासाठी अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था करावी आणि त्यासाठी स्वयंसेवक नेमावेत.
- झेड-सुरक्षा व्यवस्था
ओवैसींना झेड वर्गवारीची सुरक्षा असल्याने, सभेच्या ठिकाणी ४५x६० फूट लांबी-रुंदीचा 'डी झोन' तयार करावा लागेल. स्टेजवरील प्रमुख व्यक्तींची यादी आगाऊ देऊन पास घ्यावे लागतील.
- सुरक्षा तपासणी आणि प्रवेश
सभेचे ठिकाण चारही बाजूंनी सुरक्षित करून स्वतंत्र प्रवेशद्वारांची व्यवस्था करावी.
- ध्वनी, पोस्टर्स आणि धार्मिक भावना
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
लावण्यात आलेल्या झेंडे, पोस्टर्स किंवा जाहिरातींमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखावतील असे वक्तव्य, देखावे किंवा गाणी वापरू नयेत.
- शांतता आणि सहभाग
कार्यकर्ते कोणावरही जबरदस्तीने सहभाग करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सभा शांततेत पार पाडणे बंधनकारक.
- महिला व मुलींसाठी व्यवस्था
महिला आणि मुली सहभागी असल्यास त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरुष व महिलांसाठी दोन वेगवेगळे विभाग करावेत.
- रॅली नाही
सभेपूर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही.
- सरकारी मालमत्ता संरक्षण
कार्यकर्त्यांकडून कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अत्यावश्यक सेवा
सभेदरम्यान अत्यावश्यक सेवा चालू राहतील आणि समर्थकांकडून त्यास कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
- स्वच्छता आणि सोयी
सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशी लाईट, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांची सोय करावी.
- दौऱ्यात बदल नाही
वक्ते (ओवैसी) यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या परवानगीशिवाय दौऱ्यात बदल करता येणार नाही.
राजकीय महत्त्व आणि पुढील वाटचाल
असदुद्दीन ओवैसी यांची ही सभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूरमधील सभेच्या नंतर अहिल्यानगरमधील त्यांच्या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेत ओवैसी कोणता राजकीय संदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कालच्या तणावपूर्ण घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये ही सभा शांततेत आणि सुरळीत पार पाडणे, हे पोलीस प्रशासन आणि AIMIM च्या आयोजकांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!











Click it and Unblock the Notifications