Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

याला म्हणावं सरकारचा खरा भाऊ! लाडक्या बहिणीच्या नावाने आलेले 7500 रुपये सरकारला केले परत!

Majhi Ladki Bahin Yojna :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचेच फलित की काय राज्यात महायुतीला भरभरून मतदान झालं अन् पुन्हा महायुतीचे सरकार मोठ्या ताकदीने स्थापन झाले. लाडकी बहीण योजनेतून राज्यातील अडीच लाख महिलांना दरमहा दीड हजार प्रमाणे आतापर्यंत साडे सात हजार मिळालेले आहेत.

परंतु, जालना जिल्ह्यात अजबच प्रकार समोर आला आहे. लाडक्या बहिणीच्या नावाखाली लाडक्या भावाच्या खात्यात मिळालेले पैसे जमा त्या भावाने खूश न होता प्रामाणिकपणे सरकार दरबारी ही रक्कम जमा केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत किती मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर सरकार देखील या योजनेची आता चौकशीची तयारी करत आहे.

Majhi Ladki Bahin Yojna

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास अडीच लाख महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज दाखल करत योजनेचा लाभ घेतला. यातील बहुतांश महिलांना 1 ते 5 असे 5 हफ्त्यांचे एकूण 7500 रुपयेही थेट बँकेत जमा झाले. दरम्यान, या योजनेची चलती पाहून काहींनी बोगस कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये, काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण बनून योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता, जालन्यातील एका लाडक्या भावाने बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊन कमावलेला 7500 रुपये परत केले आहेत. त्यामुळे, या योजनेच्या माध्यमातून बनावटगिरी केलेल्यांना त्याची परतफेड करावी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बनावटगिरीने मिळालेले साडे सात हजार रुपये लाडक्या भावाने आज प्रशासनाला परत केले आहे. जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेल्या विलास भुतेकर यांच्या पत्नीकडून लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरताना नजरचुकीने विलास भुतेकर यांचं आधार कार्ड अपलोड झाले होते.

अन् भावाने प्रामाणिकपणे पैसे केले जमा

दरम्यान 5 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र, आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले आहे. त्यामुळे, भुतेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत व चुकीच्या पद्धतीने मिळालेले शासनाचे 7 हजार 500 रुपये शासनाला परत केले आहेत.

योजनेतील महिलांची पुन्हा तपासणी होणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं असून लाडकी बहीण योजना आमच्यासाठी गेमचेंजर ठरली असल्याचं महायुतीचे प्रमुख नेते जाहीरपणे सांगत आहेत. परंतु, आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची आता तपासणी होणार असून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे जमा करत, खोटी व बनावट कागदपत्रे जमा करत ज्यांनी पैसे लाटले त्यांचे अर्ज बाद केला जाणार आहेत. त्यामुळे, लाडक्या बहिणींना धास्ती लागली आहे. तर, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर अद्यापही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता न जमा झाल्याने, पुढील हफ्ता कधी जमा होणार याची वाट लाडक्या बहिणीकडून पाहिली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+