Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सतीश भोसलेंवर पडतोय पैशांचा पाऊस; अंजली दमानियांनी पोस्ट केला नवा व्हिडीओ, पहा काय आहे त्यात?

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात झालेल्या मारहाणीतील आरोपी सतीश भोसले याचा आणखी एक पैसे उधळतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला आहे. कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, असं या व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणतो आहे. अंजली दमानिया यांनी कालही सतीश भोसलेचा गाडीत पैसे मोजत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला होता.

Satish Bhosale s video

भोसले हा धसांचा कार्यकर्ता

सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि बीड येथे झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणातला आरोपी देखील आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी काल देखील सतीश भोसलेचा असाच एक पैसे फेकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आज देखील दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून सतीश भोसलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोफ्यावर बसून सतीश भोसले हा पैसे फेकत आहे आणि कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, असं म्हणतो आहे. हरिण पकडण्याच्या जाळ्यावरून भोसले याने ढाकणे पिता - पुत्राला मारहाण केली होती. भोसले याच्या शोधासाठी सध्या पोलिसांची सहा पथकं रवाना झाली आहे.

धसांनी प्रतिक्रिया द्यावी

सतीश भोसले हा आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा, अंजली दमानिया यांनी केला आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन दमानिया यांनी कालच त्याच्या एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आ. सुरेश धस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणीही दमानिया यांनी काल केली होती.

काय आहे व्हिडोओत?

अंजली दमानिया यांनी काल सतीश भोसले हा गाडीत बसलेला व नोटांचे बंडल मोजून गाडीच्या डॅशबोर्डवर फेकत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आज त्यांनी त्याचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हि़डीओत सतीश भोसले हा सोफ्यावर बसून समोरच्या टेबलवर पैशांचे बंडल फेकताना दिसत आहे. त्याच्या अंगावर कुणीतरी पैशाचा पाऊसही पाडत असल्याचे दाखवले आहे. शिवाय कुणाचा अन्याय सहन करायचा नाही, असंही सतीश भोसले म्हणत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+