Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"पोरींना नाचवणाऱ्या नीच माणसाला कोर्टात उघडं पाडणार, अनिल परबांचा रामदास कदमांवर हल्लाबोल

Anil Parab vs Ramdas Kadam controversy : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट हल्ला चढवला आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना परब यांनी कदमांचे 'डान्स बार' कनेक्शन आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 1993 मधील एका घटनेचा मुद्दा उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.

"गृहराज्यमंत्र्याने नैतिक लाज बाळगावी, राजीनामा द्यावा!"

रामदास कदम यांच्यावर आणि त्यांचे पुत्र तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका करताना अनिल परब यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

अनिल परब म्हणाले, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो, त्याला नैतिक लाज असायला पाहिजे. नैतिक लाजेने त्यांनी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता." परब यांनी थेट आरोप केला की, "पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय, त्याला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का?"

Anil Parab Targets Ramdas and Yogesh Kadam

"नीच माणसाला कोर्टात उघडं नागडं पाडणार!"

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांविरोधात परब यांनी कायदेशीर पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, "अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टासमोर उघडं नागडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे." "हे खोटं सांगत आहेत म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा (Defamation Suit) आता दाखल करत आहोत."

रामदास कदमांना भाडेखोरीच्या पैशांची सवय लागल्याचा आरोप करत परब म्हणाले की, या दाव्यात कोण डॉक्टर आहेत, ते डॉक्टर समोर आले पाहिजेत. परबांनी ठामपणे सांगितले की, ते कदमांना कायदेशीर कोर्टात खेचत आहेत आणि "१०० टक्के त्यांना माफी मागावीच लागेल."

अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की, त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिले पाहिजे आणि "हे जे असे नासके आंबे आहेत, ते मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजेत."

१९९३ मधील 'त्या' घटनेची चौकशी करा; कदमांना जाहीर आव्हान

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावर शंका उपस्थित केल्याबद्दल परब यांनी त्यांना कोर्टात जाण्याचे आव्हान दिले. परंतु, त्याचबरोबर त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना त्यांच्या स्वतःच्या घरात घडलेल्या एका अत्यंत खासगी आणि गंभीर घटनेची चौकशी करण्याचे जाहीर आव्हान दिले.

परब म्हणाले, "आज गृहराज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवता. डान्सबारवर जाऊन रेड करण्याऐवजी स्वतःच्या घरात काय चाललं त्याची चौकशी करा."

परब यांनी थेट प्रश्न विचारला, "१९९३ साली तुझ्या आईने (ज्योती रामदास कदम) का आत्महत्या करायचा प्रयत्न केला? स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला याची चौकशी कर!"

"ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला? जळाली की जाळलं?" हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

परब यांनी इशारा दिला की, आजही खेडमध्ये त्या घटनेचे साक्षीदार आहेत आणि वेळ पडल्यास त्यांना देखील कोर्टासमोर आणले जाईल.

"आपलं ठेवायचं झाकून..."

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून' अशी प्रवृत्ती असल्याचा आरोप केला.

परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी केली आहे की, त्यांनी रामदास कदमांची नार्को टेस्ट करण्यासोबतच, "माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतःला जाळून घेतलं, याचीही चौकशी कर" याचेही आव्हान दिले. "घरातील लोक आत्महत्या कशासाठी करत आहेत, मुळाशी जाऊन चौकशी करा," असे परब म्हणाले.

याचबरोबर, मागील अधिवेशनात फक्त दोनच प्रकरणे बाहेर आली होती, पण या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी प्रकरणे देणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी रामदास कदम यांना दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+