सचिन वाझेच्या आरोपावर अनिल देशमुख यांचं उत्तर, देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल
Anil Deshmukh On Sachin Waze : मुंबई पोलिस दलातून बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आरोपी सचिन वाझे यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मी 4-5 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. ही फडणवीस यांची नवीन चाल आहे. सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वाझे कारागृहात आहे.

मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करुन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. तीन वर्षांपूर्वी ते प्रतिज्ञापत्र मला पाठवल्यावर आपण त्याला नकार दिला होता. मी तुरुंगात जाईल पण त्यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र देणार नाही, असं म्हटले होतं.
आपण केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? त्याची (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टानं म्हटलं आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
सचिन वाझेच्या आरोपामुळं राजकारण तापलं
बडतर्फ असलेले पोलीस अधिकारी आरोपी सचिन वाझे यांनी एक गौप्यस्फोट करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत.
जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.












Click it and Unblock the Notifications