"मी कधीच पैसे मागितले नाही ही वाझेंचीच कबुली"- अनिल देशमुखांनी कोर्टाचा रोजनामाच दाखवला
नागपूर - अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने अथवा कुणी पैसे घेतले नाही. त्यांनी वसुली करायला सांगितली नाही, हेच सचिन वाझे यांनी जस्टीस चांदीवाल यांच्या कोर्टासमोर सांगितले असा दावा अनिल देशमुख यांनी आज केला. त्यावेळचा कोर्टाचा रोजनामाच त्यांनी सर्वांसमोर दाखवत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले अनिल देशमुख?
अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे यांची जस्टीस चांदीवाल यांच्या कोर्टात जेव्हा चौकशी झाली, तेव्हा त्यांना विचारण्यात आले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने तुम्हाला पैसे मागितले का किंवा वसुली करायला सांगितले होते का, त्यावर सचिन वाझे यांने कोर्टासमोर सांगितलं की, मला अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने कधीही पैसे मागितले नाही किंवा वसुली करायचे सांगितले नाही.

हे जस्टीस चांदीवाल यांच्या कोर्टाचा रोजनामा आहे. यात संपूर्ण मिनिट काय काय स्टेटमेंट घेण्यात आले ते स्पष्ट आहे. सचिन वझे आरोप पुन्हा करत असेल तर माझ्याबद्दलच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा.
फोडाफोडी करुन फडणवीस सत्तेत
अनिल देशमुख म्हणाले, अरे बाबा...देवेंद्र फडणवीस... गेल्या तीन वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांनीच कबुल केलं की, कशा पद्धतीनं मी ५०-५० कोटी घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले. देवेंद्र फडणवीस यांनी हेही कबुल केलं की, कशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले. म्हणजे ते दोन पक्ष फोडून सत्तेल आले. ते मोठ्या आनंदाने सांगत आहे. पण फडणवीस यांच्या माध्यमातून हे फोडाफोडीचे राजकारण जे चालू आहे त्यावर महाराष्ट्राची जनता नाराज आहे.
जनता उघड्या डोळ्यांनी पाहत
अनिल देशमुख म्हणाले, ते फोडाफोडी करत असताना जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. याशिवाय राज्यात दुसरे प्रश्न नाही का..महाराष्ट्रासमोर महागाईचा प्रश्न, बेरोजगारी, शेतकरी आदींचे प्रश्न असूनही ते याकडे लक्ष ते नाहीत. केवळ फोडाफोडी करुन त्यांनी राजकारण खालच्या स्तरावर आणले आहे. आमचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी इडी, सीबीआयचा वापर केला.
लाडक्या खुर्चीसाठी लाडकी, बहिण, भाऊ आठवतोय
अनिल देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणूक आली म्हणून यांना लाडकी बहिण, लाडका भाऊ आठवतो. पण हा सारा खटाटोप लाडक्या खुर्चीसाठी सुरु आहे. योजनेसाठी आर्थिक तरतुद हवी असते ती करायला हवी पण यांचा फक्त दोन तीन महिने योजना राबवण्याचा निर्णय दिसतोय.












Click it and Unblock the Notifications