फडणवीसांनी पाठवलेल्या 'त्या' व्यक्तीचं अनिल देशमुखांनी नाव केलं उघड! म्हणाले - बात दुर तक जाएगी

नागपूर - भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून अनिल देशमुखांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर आरोपाचा नवीन एक बाँम्बगोळा टाकला आहे.

तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या एका व्यक्तीाल आपल्याकडं प्रतिज्ञापत्र घेऊन पाठवलं होतं. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितले असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

Devendr Fadanvis special person Smit Kadam vs anil deshmuk affidavit Aditya Thakeray Ajit Pawar

'जेल में जाओ नही तो बीजेपी में आओ..'

अनिल देशमुखांनी आरोप करताना म्हटलं की, मला भाजपकडून ऑफर होती. जेल में जाओ नही तो बीजेपी में आओ असं त्यांचं धोरण असल्याचंही देशमुख म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यात आला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता.फडणवीसांनी पाठवलेला आहे का खास माणसाने तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिल्याचे देशमुख यांनी सांगितले होते.

'त्या' माणसांचे नाव उघड

देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या त्या व्यक्तीचं नावही अनिल देशमुख यांनी आज उघड केलं. तो खास माणूस असून फडणवीस आणि समीत कदम यांच्यातील जवळच्या संबंधांना फोटो दाखवत त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहे.

3 वर्षांपुर्वीचा 'तो' प्रकार केला उघड

तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या सुमित कदमला प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे पाठवलं होतं. त्यानेच प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं. सुमित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध असून त्यांचे फोटो आहेत. सुमित कदम यांची पत्नी फडणवीस यांना राखी बांधते. असे सांगत अनिल देशमुख यांनी तसे फोटो माध्यमांना दाखवले.

नेत्याच्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न

सुमित कदम साधारण कार्यकर्ता आहे. तो साधा नगरसेवकही नाही. तरीही त्याला वाय सुरक्षा देण्यात आली. मी जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या असत्या, असं अनिल देशमुख म्हणाले. खोट्या आरोपांखाली उद्धव ठाकरेंना अडकवणं मी समजू शकतो. ते राजकीय विरोधक आहेत. मात्र राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे असाही देशमुखांनी आरोप केला.

अनिल देशमुखांचा दावा

उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सलियानवर बलात्कार करून बालकणीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास त्यांनी सांगितले होते असा दावाी महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+