Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मला त्या अहवालात क्लिन चिट! म्हणूनच फडणवीस माझ्याविरुद्धचा चौकशी अहवाल उघड करत नाही - अनिल देशमुख

तीन वर्षांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांना जे आरोप माझ्यावर करायला लावले होते, तेच तेच आरोप काल माझ्यावर त्यांनी पुन्हा केले. या आरोपाची चौकशी झाली. मला त्या अहवालात क्लिन चिट देण्यात आली. म्हणूनच फडणवीस माझ्याविरुद्धचा चौकशी अहवाल उघड करत नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

फडणवीसांनी तो अहवाल उघड करावा

या आरोपाचा चौकशी अहवालही देवेंद्र फडणवीसांच्याच गृहमंत्रालयाकडे आहे. फडणवीस हा अहवाल जनतेसमोर का उघड करत नाही तो त्यांनी उघड करावा अशी मागणीही त्यांनी केली. या विषयी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी करत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.

anil deshmukh on devendra fadanvi over demand for disclosure of justice chandilal report

चौकशी करा ही माझीच मागणी होती

देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपुर्वी माझ्यावर सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांना आरोप करायला लावले. काल हेच आरोप त्यांनी पुन्हा माझ्यावर केले आहेत. जेव्हा त्यावेळी माझ्यावर आरोप करायला लावले होते त्यावेळी मी स्वतः माझी उच्चपदस्त चौकशी करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर हायकोर्टाचे जज चांदीवाल यांना चौकशीचे आदेश देण्यात आले.

तो अहवाल त्वरीत जनतेसमोर आणावा

देशमुख म्हणाले, न्यायमुर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची अकरा महिने चौकशी केली. त्यानंतर दोन वर्षांपुर्वीच तो चौकशी अहवाल सरकारला दिला होता. तो अहवाल सध्या गृहमंत्र्यांकडे आहे. मी वारंवार मागणी करतोय की, चांदीवाल यांनी जी चौकशी केली होती, तो जस्टीस चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. 1400 पानांचा तो अहवाल आहे.

वारंवार विनंतीनंतरही अहवाल उघड होत नाही

देशमुख म्हणाले, सचिन वाझेच्या आधारे माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करायला लावला. त्यांचा आधार देवेंद्र फडणवीस घेतात ही आश्चर्याची बाब आहे. परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर तीन वर्षांपुर्वी आरोप लावायला सांगितले, त्यानंतर माझी चौकशी झाली. मी वारंवार विनंती करुनही राज्यशासन माझ्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणत नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, हा अहवाल त्यांच्याच गृहमंत्रालयाकडे आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा.

सुडबिद्धीने माझ्यावर आरोप

अनिल देशमुख म्हणाले, 3 वर्षांपूर्वी परमबीर सिंग व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी अकरा महीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान दहशतवादी व दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने मला पैसे मागीतले नाहीत आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली'', असा हल्ला अनिल देशमुखांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+