भाजप म्हणतंय, हल्ला ही अनिल देशमुखांचीच 'स्टंटबाजी'; एसपींनीही दिली हल्ल्याची माहिती
Attack on Anil Deshmukh- विधानसभा प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. मात्र या प्रचाराला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. नागपूर जिल्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. हल्ल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले. या हल्ल्याबाबत आता पोलिसांनीही माहिती दिली आहे.

#WATCH | Maharashtra | SP - Nagpur Rural, Harsh Poddar says, "Today, around 8 PM, an incident took place in Katol assembly constituency. Anil Deshmukh was coming from Narkhed towards Katol after completing his meeting. According to the primary information, stones were pelted on… https://t.co/dxwAqMpwYM pic.twitter.com/XdlZCcPdyg
— ANI (@ANI) November 18, 2024
Nagpur, Maharashtra | NCP-SCP leader Anil Deshmukh alleges that some people pelted stones at his car on Katol Jalalkheda Road in Katol Assembly Constituency. He suffered injuries in the incident and is being taken to a nearby hospital.
— ANI (@ANI) November 18, 2024
Anil Deshmukh's son Salil is contesting the… pic.twitter.com/lwAuzCvOxs
काय म्हणाले नागपूरचे एसपी?
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या हल्ल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, सोमवारी रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला असून तपासावर देखरेख करत आहे. आताच काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू.
देशमुख कुटुंबियांचे म्हणणे काय?
जखमी अनिल देशमुख यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रात्री नागपूरच्या अलेक्सिस रुग्णालयात आणले आहे. या प्रकाराबाबत अनिल देशमुख यांचे पूत्र आणि काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनीही माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना सलील देशमुख म्हणाले की, मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजपा प्रत्येक ठिकाणी वाईट पद्धतीने पराभूत होत आहे. त्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांचे डोके फोडले जाईल, असा संदेश भाजप असा हल्ला करुन देत आहे. काटोल, नरखेडमध्ये अशांतता पसरविण्याचाच हा प्रकार आहे, असाही आरोपही सलील देशमुख यांनी केला.
भाजप म्हणते हल्ला स्वतःच केला
भाजपने ही 'स्टंटबाजी' आहे, असा आरोप केला. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत आहे. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली.












Click it and Unblock the Notifications