Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : जळगाव प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे काम देशमुख यांनी केल्याचा आरोप आहे. यावरुन आता अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या कृपेने आता माझ्या घरावर छापा पडू शकतो, मला लवकरच अटक देखील होऊ शकते, असा दावा देशमुखांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, जळगावमधील चार वर्षांपूर्वीचं एक जूने प्रकरण उकरून काढत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने 'सीबीआय'ने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. जळगावमधील भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या एका प्रकरणात मी गृहमंत्री असताना पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे.

Anil Deshmukh  Devendra  Fadnavis

देशमुख पुढे म्हणाले की, माझी माहिती अशी आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्या घरी कधीही छापा पडू शकतो किंवा मला अटक केली जाऊ शकते. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी ईडी आणि 'सीबीआय'चा वापर करत राज्यातील राजकारण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी माहिती आहे की, मला अटक केलं जाईल. मला अटक करायचं असेल तर मी तयार आहे", असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

देशमुखांविरोधात गुन्हा दाखल झालेलं प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह देखील सादर केला होता. तसेच तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुख आपल्याला सातत्याने फोन करत होते, असं जबाबात म्हटलं होतं. याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशमुखांच्या ट्विटमध्ये काय?

अनिल देशमुख यांनी एक्सवर(ट्विटर) यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने माझ्या घरी कधीही छापा पडू शकतो, मला अटक केली जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहतोय", असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल देशमुखांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+