Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्धव ठाकरे यांचा किल्ला जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे सज्ज! अंधेरी 'पूर्व'मधून मुरजी पटेल रिंगणात

Andheri East Assembly Election 2024 : मुंबईच्या पश्चिम उपनगरात शिवसेनेची संघटना अत्यंत मजबूत आहे. महानगरपालिका आणि आमदारकीच्या निवडणुकीत या संघटनाचा पक्षाला फायदा होतो. अलीकडच्या काळात भाजपने देखील पश्चिम उपनगरात चांगलेच बस्तान बसवले आहे.

पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व हा परिसर बहुभाषिक म्हणून ओळखला जातो. अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या या भागाच्या आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात लोकप्रिय स्थानिक कार्यकर्ते मुरजी पटेल यांना संधी दिली आहे.

Andheri East Assembly Election 2024

धडाकेबाज सामाजिक कार्यकर्ते

मुरजी पटेल अंधेरी पूर्व येथील धडाकेबाज सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरू असते. असंख्य सेवाभावी उपक्रम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून राबवले आहेत. आधार नोंदणी, गोरगरिबांना आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून देणे, महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवणे अशी कामे त्यांच्या संस्थेकडून केली जातात. अंधेरी पूर्व परिसरात मालपा डोंगरी हा उंचावरील भाग आहे. येथे पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. महानगरपालिकेने पायथ्यापर्यंत पाणी देण्याचे मान्य केले होते. पण पाणी वर उचलून नेण्याची जबाबदारी स्थानिकांनाच पार पाडावी लागणार होती.

मुरजी पटेल यांनी पुढाकार घेऊन या परिसरासाठी पंपिंग स्टेशन निर्माण केले आणि या डोंगर परिसरात पाण्याची उपलब्धता झाली. या सामाजिक कामांच्या माध्यमातून अंधेरी पूर्व परिसरात मुरजी पटेल यांनी प्रचंड मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. पूर्वी ते अंधेरी पूर्व भागातूनच नगरसेवक होते मात्र त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद गेले. मात्र अंधेरी पूर्व भागात मुरजी पटेल यांची क्रेझ अद्याप कायम आहे. काका या टोपण नावाने त्यांना या परिसरात ओळखले जाते. 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून मुरजी पटेल संपूर्ण मतदारसंघात ज्ञात आहेत.

अंधेरी पूर्वमधून पोटनिवडणुकीत माघार

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश लटके विजयी झाले. पण काही काळात त्यांचे निधन झाले आणि अंधेरी पूर्व मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. तोपर्यंत शिवसेनेची दोन शकले उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष कायम राहिला होता, पण चिन्हाचा निकाल देण्यात आला नव्हता. पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली तर भाजपने मुरजी पटेल यांना संधी दिली होती.

पटेल यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली होती. मात्र अखेरच्या क्षणी पक्षाने त्यांना माघार घेण्याचा आदेश दिला आणि ऋतुजा लटके विधानसभेत निवडून गेल्या. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात ही पोट निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. पटेल यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकाचे तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. अनेकांनी तर ओक्साबोक्शी रडून आपला राग व्यक्त केला होता. आता अंधेरी पूर्वची ही जागा युतीत शिवसेनेला देण्यात आली आहे आणि मुरजी पटेल यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देखील दिली आहे.

अंधेरी पूर्व परिसरातील जनतेने आतापर्यंत संमिश्र कौल दिलेला आहे. काँग्रेसचे सुरेश शेट्टी या मतदारसंघातून निवडून यायचे. त्यानंतर ही जागा शिवसेनेच्या रमेश लटके यांनी जिंकली. आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेना असा सामना या मतदारसंघात रंगतो आहे. अंधेरी पूर्वची ही जागा युतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असून मुरजी पटेल यांच्या विजयासाठी युती जंग-जंग पछाडणार हे स्पष्ट आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते ही बाब देखील विशेष आहे.

महायुती सरकारची अनेक विकासकामे

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारने अनेक कामे केली आहेत. येथील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मुंबई मेट्रो पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात राबवझिरप झिरपवण्यासाठी प्रयत्न केले. सभा मतदारसंघात 24 हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

लक्षवेधी लढत

अंधेरी पूर्व जी ही लढत लक्षवेधी होणार यात काहीही शंका नाही. कारण ही उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुंबईतली कोणतीही जागा हातची जाऊ द्यायची नाही असा ध्यासच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अन्य नेत्यांनी घेतला आहे. तर कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर असलेले उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व संपुष्टात आणायचे असा निर्धार महायुतीने केला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ची जागा प्रतिष्ठेची ठरली आहे.

मतदारसंघातील राबवलेली विकासकामे, प्रचंड जनसंपर्क लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तिकिटावर लढणारे मुरजी पटेल या निवडणुकीत बाजी मारतील, असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+