Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमृता फडणवीसांचा शरद पवार, राज-उद्धव, एकनाथ शिंदेंवर खास 'डायलॉग!' खास अंदाजात नेत्यांवर प्रहार

Amruta Fadnavis Compares Devendra Fadnavis to Nayak : राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांची एक ताजी मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची तुलना थेट बॉलिवूडमधील गाणी, चित्रपट आणि डायलॉग्सशी करत अत्यंत खास शैलीत त्यांची मतं मांडली आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी आपले पती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करताना त्यांची तुलना 'नायक' चित्रपटातील अभिनेत्याशी केली आहे.

Amruta Fadnavis

पती देवेंद्र फडणवीस यांच्यावर खास भाष्य

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या शैलीबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांची तुलना 'नायक' चित्रपटातील अनिल कपूर यांच्याशी केली आहे. "मला देवेंद्र फडणवीस नायक चित्रपटातील अनिल कपूरसारखे वाटतात, कारण अनिल कपूर दबावाखाली काम करत नाही,"त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे आणि ते याच ऊर्जेने काम करतात," असे कौतुक त्यांनी केले.

राजकीय नेत्यांबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

मुलाखतीदरम्यान काही नेत्यांची नावे सांगितल्यावर अमृता फडणवीस यांना त्या नेत्यांसाठी पटकन आठवणारे चित्रपट, गाणे किंवा पात्र सांगण्यास सांगण्यात आले. त्यांनी दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत.

नेत्यांबद्दल अमृता फडणवीस यांचे खास बोल

राज ठाकरेबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांची तुलना थेट नाना पाटेकर ब्रँडशी केली. राज ठाकरे खूप आक्रमक आहेत आणि त्यांच्या वागणुकीतून अशी भावना येते की, त्यांच्यासमोर जे कोणी येईल, त्याला ते "खाऊन टाकाल" (राजकीय दृष्ट्या) असे त्यांना वाटते. त्यांच्या या आक्रमक शैलीमुळेच त्यांना हा ब्रँड आठवला.

उद्धव ठाकरेबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता, अमृता फडणवीस यांना प्रसिद्ध चित्रपट 'शोले'मधील जेलर आठवले. 'शोले'मधील 'अंग्रेजों के जमाने का जेलर हूँ मैं...' हा डायलॉग त्यांना उद्धव ठाकरे यांच्यासाठी पटकन आठवला.

शरद पवारबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत बोलताना त्यांना थेट 'डॉन' चित्रपटातील गाण्याची आठवण झाली. त्यांनी, 'अरे दिवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन? मैं हूँ डॉन' हे गाणं शरद पवार यांच्यासाठी योग्य असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदेबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी नुकत्याच आलेल्या 'धर्मवीर' चित्रपटाचा संदर्भ दिला. धर्मवीर चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांचे पात्र साकारण्यात आले होते आणि अमृता फडणवीस यांच्या मते, 'धर्मवीर' चित्रपटातील एकनाथ शिंदे हेच आजचे एकनाथ शिंदे आहेत.

अजित पवारबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीत अमृता फडणवीस यांनी खास फिल्मी अंदाजात भाष्य केले. त्यांनी अजितदादांबद्दल फक्त, 'दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला' हे गाणे आठवले, इतकेच म्हणेन, असे सांगितले.

सुप्रिया सुळेबद्दल काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांना चांगल्या स्क्रिप्ट रायटर होण्याचा सल्ला दिला. सुप्रिया सुळे स्वतः चित्रपट लिहू किंवा दिग्दर्शित करू शकतात, असे त्यांचे मत आहे. यामागचे कारण देताना त्यांनी आठवण करून दिली की, 'एक अकेला देवेंद्र क्या कर सकता है?' हा सुप्रिया सुळे यांचा डायलॉग खूप व्हायरल झाला होता, त्यामुळे त्यांनी स्क्रिप्ट रायटर व्हावे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+