Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खळबळजनक! आधी कारने उडवलं, नंतर हत्यारानं भोसकलं! अमरावतीत भर रस्त्यावर पोलिसाचा खून! काय आहे कारण?

Amravati Crime News update : अमरावतीच्या वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक अर्थात एएसआयचा क्रुरपणे खून करण्यात आला आहे.ही घटना घडल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तिघांना अटक झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, अब्दुल कलाम अब्दुल कदर असे मृत पोलिसाचे नाव आहे.ते ५६ वर्षीय अब्दुल हे जमीन काॅलनी येथे राहत होते. शनीवारी २८ जून २०२५ रोजी सायंकाळी त्यांचा मारेकऱ्यांनी खून केला होता.

Amravati Crime News update Policeman murdered

असा केला सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा खून

शनीवारी सायंकाळी मोपेड दुचाकीने अब्दुल हे वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते. त्यावेळी नवसारी टी पाॅईंटजवळ त्यांची काहीजण वाट पाहत होते. अब्दुल यांची मोपेड दुचाकी येताच त्यांच्या मागून मोपेडला भरधाव कारने धडक दिली. यानंतर मारेकरी वारंवार कारची मोपेडला धडक देत राहीले नंतर कारमधून उतरून त्यांनी अब्दुल यांच्यावर वार केले. यात अब्दुल हे रक्तबंबाळ झाले. दरम्यान याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Take a Poll

डाॅक्टर म्हणाले- हा अपघात नव्हे घात!

अब्दुल यांचा अपघात झाल्याचे सहकाऱ्यांच्या कानावर आले तेव्हा त्यांनी अब्दुल यांना रुग्णालयात नेले मात्र तो अपघात नसून खून असल्याचे शस्त्राने भोसकल्याचे लक्षात येताच डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे कारण?

प्राप्त माहितीनुसार, २१ जून २०२५ रोजी आर्थिक व्यवहारातून एहसानउद्दीन सिराजउद्दीन यांनी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर यात अब्दुल यांचे भाऊ अ.सलाम व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पैशांच्या व्यवहारातून वादातूनच अब्दुल यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+