'त्या' आमदाराने केलं नववधूंचं वर्गीकरण; म्हणाला, खेबड्या-बेबड्या मुलींचा गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना..

महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्टेटमेंट वाँर सुरु असताना आज पु्न्हा एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं. अमरावतीलतील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार समर्थक आ. देवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. मुलींच्या तीन कॅटेगरी करत कोणत्या नववराला कोणती मुलगी मिळते, हे त्यांनी उदाहरणवार सांगितले. सुंदर मुलगी तुमच्या-माझ्यासारख्याला भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबर सुंदर असलेली मुलगी किराणा दुकानदाराला मिळते तर तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याला मिळतो, असं म्हणत आ. भुयार यांनी नव्या वादाला तोंड फोडलं.

नेमकं काय म्हणाले आ. भुयार...

आ. भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते म्हणतात, मुलगी चांगली असेल तर तिला मुलगाही गोरा, स्मार्ट पाहिजे. एक नंबर देखणी मुलगी तुमच्या- माझ्यासारख्याला भेटत नाही. ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी किराणा दुकानदार, पानटपरीवाल्याला मिळते. आणि तीन नंबरचा गाळ, हेबडली-हाबडलेली मुलगी शेतकऱ्याच्या पोट्ट्यांना मिळते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं नाही. माय इल्लू-पिल्लू त्याच्या पोटी वानराचं पिल्लू... असाच कार्यक्रम सुरु आहे, असं म्हणत आ. भुयारांनी महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलं.

Devendra Bhuyar

अजित पवार आले अडचणीत

आ. देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जोरदार प्रचार सुरु असताना आ. भुयार यांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत सापडले आहेत. आ. भुयार यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांतील महिलांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर अजितदादांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. महिलांचं असं वर्गीकरण कुणीही खपवून घेणार नाही, असा इशारा आ. ठाकूर यांनी दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+