सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी कराडांशी संपर्क; NCP आमदाराचा गंभीर आरोप
Amol Mitkari Attack on MLA Suresh Dhas : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी आहे. धनंजय मुंडेंवरचे आरोप म्हणजे मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी आखलेला डाव आहे. सध्या मस्साजोग प्रकरणात राजकारण सुरु असून बीडच्या अनेकांना धनंजय मुंडेंचा राजकीय काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. तर त्यांनी थेट सुरेश धस यांच्यावर देखील निशाणा साधला.
देशमुखांच्या हत्येूपूर्वी सुरेश धस वाल्मिक कराडांच्या संपर्कात
संतोष देशमुखांच्या हत्येआधीच्या दोनदिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे, धस यांचा सीडीआर काढला पाहिजे, सुरेश धस यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. ते एका वृत्तवाहिणीशी बोलत होते. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येआधी 2 दिवस सुरेश धस यांनीच वाल्मिक कराड यांच्यासोबत फोनवरुन संपर्क केला होता, असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.

सुरेश धसांचे अनेक प्रकरणे बाहेर काढणार?
अमोल मिटकरी यांनी सुरेश धसांवर देखील गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, हमाम मे सभ नंगे है, असे विधान करत आरोप केला. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे आमदार सुरेश धस यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढणार आहोत. जानेवारी 2001 साली पाथर्डी तालुक्यातील एका गावात दरोडा, त्याच दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेही समोर आणणार असल्याचे सुरेश धस म्हणाले.
धसांवर खंडणी, हत्या व जमिनी बळकावण्याचे गुन्हे दाखल
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत, असे आरोप मिटकरी यांनी म्हटले. आपणचं शहराचं वासेपूर करत दुसऱ्यांकडे बोट दाखवतोय, असेही मिटकरी म्हणाले.
आष्टी, पाटोद्यासह बीडमध्ये हुकूमत तयार कोणी केली?
सुरेश धस यांनीच आष्टी, पाटोद्यासह बीडमध्येही हुकूमत तयार केली होती. इतिहासात तेच आका होते. मी त्यांच्यावर आरोप केले की मला थेट हत्येच्या धमक्या येत आहेत. पण, धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे आरोपांची यादी प्रचंड मोठी आहे. निवडणूक निकालानंतर पालकमंत्रीपद आपणास मिळेल असं धस यांना वाटलं होतं, पण ते मिळत नाही हे दिसत असल्याने धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचं काम सुरू अहे, असेही ते म्हणाले.
सुरेश धस यांचा बोलवता धनी कोण?
8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानांची 1421 कोटींची 485 एकर जमीन कोणी हडप केली, हे बीडकरांना माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करत असताना किती निष्पापांचे मुडदे आष्टीतील बंगल्यात गाडले गेले हेही माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप प्रकणात विरोध करणाऱ्या राम खाडे सारख्या तरुणांचे किती हाल केले, हे बीडकरांना विचारा, असे म्हणत गंभीर आरोप मिटकरी यांनी केले आहेत.
लक्ष्मण हाकेंचेही धस यांच्यावर गंभीर आरोप
प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात देवस्थानाची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले आहेत. सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबीची धाड पडून त्याच्या PA कडे घबाड सापडलेले देशातील एकमेव नेते सुरेश धस असल्याचेही हाके यांनी म्हटलं आहे. तसेच, जरांगे आणि धस यांच्यात कोल्डवार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.












Click it and Unblock the Notifications