विकासकामांच्या आड पैशांचा खेळ? अमोल बालवडकरांवरील गंभीर आरोपांमुळे खळबळ
Pune Municipal Election | विद्यमान राजकीय वातावरणात बाणेर-बालेवाडी परिसरातून एक खळबळजनक आरोप समोर आला आहे. "आमच्या भागाचा विकास का थांबला?" या प्रश्नाचे उत्तर शोधताना आता भ्रष्टाचाराचे आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचे पदर उलगडू लागले आहेत. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांनी थेट नाव न घेता राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्यावर गंभीर ठपका ठेवला असून, रस्त्यांच्या कामात 'पैसे खाल्ल्याचा' खळबळजनक दावा केला आहे.

विकासाचा 'स्मार्ट' अडथळा?
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेरमध्ये २१ महत्त्वाकांक्षी कामे सुरू आहेत. ज्युपिटर रस्ता ते लक्ष्मीमाता मंदिर, एफ रेसिडेन्सी ते वाकड ब्रीज आणि पॅनकार्ड ते धनुकडे वस्ती यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे संथ गतीने का सुरू आहेत, याचे गुपित आता समोर येत आहे. लहू बालवडकर यांच्या दाव्यानुसार, स्वत:ला 'लोकप्रतिनिधी' म्हणवणाऱ्यांनी ठेकेदारांवर दबाव टाकून आर्थिक हितसंबंध जपले. "कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी कामात अडथळे आणले गेले," असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
तिकीट कापले की 'कर्म' फळाला आले?
अमोल बालवडकर यांना भाजपने उमेदवारी का नाकारली? यावर भाष्य करताना लहू बालवडकर यांनी सडेतोड मते मांडली आहेत. त्यांच्या मते.
- गेल्या दीड वर्षांपासून अमोल बालवडकर पक्षात सक्रिय नव्हते.
- केवळ स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांना हरताळ फासला.
- भ्रष्टाचाराची ही प्रकरणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचली होती, म्हणूनच त्यांचे तिकीट कापले गेले असावे.
श्रेयवादाची लढाई आणि अर्धवट स्वप्ने
बाणेरमध्ये ई-लर्निंग स्कूल, भव्य रुग्णालय आणि उद्याने उभारली गेली खरी, पण ती केवळ 'शोभेच्या वास्तू' ठरत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या रुग्णालयाची इमारत धूळ खात पडली आहे. तिथे कर्मचारी भरती किंवा निधीसाठी पाठपुरावा करण्याऐवजी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा 'नरेटिव्ह' अमोल बालवडकर यांनी रचल्याचा पलटवार लहू बालवडकर यांनी केला आहे.
बंडखोरी की सत्तेसाठी लाचारी?
लहू बालवडकर यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. पक्षात राहून निष्ठा जपण्याऐवजी, तिकीट मिळवण्यासाठी अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची मदत घेतल्याचा दावा त्यांनी केला. "एकीकडे पक्षाशी निष्ठा सांगायची आणि दुसरीकडे विरोधकांशी हातमिळवणी करायची," ही दुटप्पी भूमिका बाणेरकर ओळखत नाहीत का? असा टोलाही त्यांनी लगावला.
निष्ठा विरुद्ध महत्त्वाकांक्षा
गेल्या निवडणुकीत प्रकाश बालवडकर यांना तिकीट नाकारून अमोल यांना संधी दिली गेली होती. तरीही प्रकाश बालवडकर यांनी पक्ष सोडला नाही. याउलट, यंदा संधी हुकताच अमोल यांनी बंडखोरीची भाषा करणे, हे त्यांच्या सत्तेच्या हव्यास अधोरेखित करते, असे चित्र लहू बालवडकर यांनी रंगवले आहे.












Click it and Unblock the Notifications