राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? 'हा' नेता म्हणाला- "ते एकत्र येऊच नये!" पण का? ही दिली कारणे
Amit Thackerays opinion on Raj Thackeray Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे दोन हात असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकर हे दोन भाऊ वेगळे झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची समिकरणेही बदलली. गेल्या अनेक वर्षांत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न झाले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत असे अनेकांना वाटते पण एक नेता असाही आहे ज्याला आता हे दोघे भाऊ एकत्र यावे असे वाटत नाही. या नेत्याने यावर आपलं परखड मतही व्यक्त केलं.

कोण आहे तो नेता..?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये असे दुसरे तिसरे कुणी नव्हे तर खुद्द राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि माहीम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणारे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी हे असे का म्हटले हा विचारकरण्याजोगा प्रश्न आहे. त्यावर अमित ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मतंही व्यक्त केले आहे.
काय म्हणाले ठाकरे?
दोन भाऊ एकत्र यावेत असं जे काही बोललं जातं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते मला मुळीच वाटत नाही. माझ्या डोक्यातून ते निघून गेलं आहे. 2017 मध्ये असं वाटत होतं. 2014 मध्येही वाटलं होतं. 2019 मध्येही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे काही प्रय़त्न झाले. पण आता माझ्या डोक्यातून तो विषय संपला आहे. असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अजिबात एकत्र येऊ नये"
अमित ठाकरेंनी दिली ही कारणे
1. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अजिबात एकत्र येऊ नये. कारण पक्षनिष्ठा हा विषय महत्त्वाचा असतो.
2. मी आजारी असताना आमचे सहा नगरसेवक फोडण्यात आले. सातव्या नगरसेवकालाही ऑफर होती. त्यांनी आम्हाला फोन करुन सांगितलं, अशा काळात त्यांनी फोडाफोडी केली होती.
3. आज 40 आमदार फुटल्यानंतर जे खोके खोके करत आहेत त्यांना त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नव्हती का?
अमित ठाकरे आदित्य आणि तेजस ठाकरेंशी बोलतात का?
अमित ठाकरे म्हणाले, "तेजस माझ्यापेक्षा खूप लहान आहे, त्यामुळे त्याच्याशी ही चर्चा करण्यात काही अर्थ नाही, तशी काही चर्चा होत नाही. आदित्यही माझ्यापेक्षा लहान आहे. पण तो राजकारणात आहे. 2017 मध्ये त्यांच्या पक्षाने जे काही केलं त्यानंतर माझा आणि आदित्यचा काहीही संवाद नाही."












Click it and Unblock the Notifications