Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमित शहांचे निर्देश.. म्हणाले - काँग्रेस, ठाकरे गट शरद पवारांचे कार्यकर्ते फोडा अन् आपल्याकडे जोडा!

Amit Shah visit Maharashtra Instructions to BJP leaders : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रंग चढत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे राजकीय दौरे सुरु झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरनंतर आता नाशिक आणि कोल्हापुरमध्ये अमित शहांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनितीनुसार, जोरदार फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जो संदेश दिला त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अमित शहा यांनी जागावाटपाच्या फार्म्युल्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेतली होती. सुमारे 155 किंवा 150 जागा लढणार अशी माहिती आतल्या गोटातून मिळाली आहे. या जागा जिंकण्यासाठी अमित शहांनी नेत्यांना कानमंत्र दिला आहे. काँग्रेस, ठाकरे गट शरद पवारांचे कार्यकर्ते फोडा अन् आपल्याकडे जोडा असं वक्तव्य त्यांनी केलं असून यामुळे आता चांगलीच खळबळ निर्माण आहे.

Amit Shah visit Maharashtra Instructions to BJP leaders

आता त्यांना (मविआला) दाखवून द्यायचेय

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस काल संपला. अमित शाह नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. अमित शहांची नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलीयं. नाशिक विभागाच्या 47 जागांचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतला. भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आल.

महाराष्ट्रात सगळे विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत. आता त्यांना दाखवून द्यायचेयं. त्यामुळं ही निवडणूक ताकदीनं लढवा असं ते म्हणाले. सगळ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर आहे. लोकसभेत विरोधी पक्षांनी जे नेरेटिव्ह सेट केलयं ते खोडून काढा. एकजुटीनं महायुतीचं काम करा असा कानमंत्रच अमित शहा यांनी नाशिकच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

भाजपचे महाराष्ट्र जिंकण्याचे ध्येय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं वक्तव्य अमित शहा यांनी केलयं. अमित शहांनी यावेळी जे वक्तव्य केलं त्यामुळं त्यांवरुन भाजपसाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक किती महत्वाची आहे हे स्पष्ट होतेयं. विशेष म्हणजे त्यांना विरोधकांना चारीमुंड्या चित करायचयं हेही स्पष्ट होतयं. मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.

विदर्भ, मराठवाड्यात शहांचे मिशन

एकीकडं मराठवाड्यात 30 जागा जिंकण्याचे मनसुबे भाजपचे आहेत हे खुद्द अमित शहांनी स्पष्ट केलचं पण विदर्भातील 45 जागा जिंकण्याचा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केलायं, म्हणजेच मराठवाड्यात मिशन 30 आणि विदर्भासाठी अमित शहांनी मिशन 45 चं लक्ष्य ठेवलं.

तर दुसरीकडं परवाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली, त्यावेळी या बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील जागावाटपावर चर्चा झालीय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीत उपस्थित होते. त्यामुळं महाविकास आघाडीच्या आधीच महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला जाहीर होणार असे याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+