Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर, पीएम मोदींचा देखील 26 सप्टेंबरला पुणे दौरा

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व गंभीर झाले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतःहून महायुतीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा राज्याच्या त्या भागांवर विशेष लक्ष देत आहेत, जिथे महायुतीचा पराभव होण्याची शक्यता विविध एजन्सींच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा आज 24 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

amit shah and pm modi

आज नागपुरात पोहोचल्यानंतर अमित शाह दुपारी 2 वाजता सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजी नगर, सिडको क्र. 6, रुक्मणी हॉल, MGM कॅम्पस येथे पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

नाशिकचाही दौरा करणार

यानंतर 25 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकला रवाना होणार आहेत. दुपारी 02:40 वाजता त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये पक्षाचे प्रमुख नेते आणि अधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करतील.

पंतप्रधान मोदींचा 26 आणि 27 सप्टेंबरला पुणे दौरा

अमित शाह यांच्या दौरा झाला की, लगेच दुस-या दिवशी 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा असणार आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे आणि वाहतूक आराखडा तयार करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+