Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दानवेंच्या निलंबनाबाबत पुन्हा मोठी बातमी समोर

मुंबई- सभागृहाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला असून त्यांच्या शिक्षेत दोन दिवसांची सूट देण्यात आली आहे.

Ambadas Danve

आता दानवे यांना पाच दिवसांऐवजी तीन दिवस निलंबित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून दानवे हे सभागृहाच्या कामकाजात दिसू शकणार आहेत.

अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांच्या कृत्याबाबत तातडीने निलंबित केलं होतं. अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दानवे यांच्या माफीनाम्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासुन अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत.

दानवे काय म्हणाले?

निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर दानवे म्हणाले, निलंबन मागे घेण्यासाठी उशीर केला. निलंबनाचा निर्णय मागे घेऊन, त्यांनी खूप काही असं वेगळं केलं असं नाही. मी दिलगिरी व्यक्त केली होती. त्याचवेळी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी तीन दिवस यामध्ये गेले. उद्यापासून मी सभागृहात जाईल. अधिवेशनाला आता चार ते पाच दिवस उरले आहेत. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे.

नेमकं काय होतं प्रकरण

सोमवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा गदारोळ झाला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका व शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. दानवेंनी चूक मान्य करुन माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती. हे सगळं सभापतीसमोर घडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+