Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हार्वेस्टर अनुदान घोटाळा..अन् बीडचे दोन्ही आका; सुरेश धस पुन्हा कडाडले अन् धनंजय मुंडेंवर बरसले

BJP MLA Suresh Dhas Allegation On Dhananjay Munde : बीडसह राज्यभरात झालेल्या हार्वेस्टर मशीन अनुदान घोटाळ्यात दोन्ही आका सहभागी असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शेतकऱ्यांची फसणवूक केली असून पैसे परत मागणाऱ्या शेतककऱ्यांना मारहाण केली गेली, असे म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

परळीत तालुक्यात राखेची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने सरपंचाला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. चोंढवाना गावच्या सरपंचाचा खात्मा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला. परंतु हा घातपात आहे की अपघात आहे, हे अजून सिद्ध झाले नाही, त्याचा तपास पोलिस यंत्रणांनी करावा, असेही मागणी सुरेश धसांनी केली आहे.

MLA Suresh Dhas on Dhananjay Munde

टिप्परच्या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार

चोंढवाना गावच्या सरपंचाचा खात्मा करण्यात आला. हा घातपात आहे की अपघात, याचा तपास करावा लागेल. महाराष्ट्रात परळीची भयानक चर्चा सुरू असून देखील राखेचे टिप्पर बंद नाहीत. आजही राखेच्या टिप्परची अवैध वाहतूक सुरू आहे. या सर्व प्रकाराला परळीचे पोलिस आणि थर्मल पावरचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.

बाकी जिल्ह्यातूनही हा घोटाळा येईल समोर

वाल्मीक कराडने ऊसतोडणी यंत्रासाठी अनेकांकडून पैसे घेतलेत. 141 शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन द्यायच्या होत्या. या लोकांनी 2 ते 5 हजार लोकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये जमा केले. परंतु केवळ 141 शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन दिल्या. या प्रकरणात पंढरपूर तालुक्यात पहिला गुन्हा दाखल झाला. अशाप्रकारचे गुन्हे आता कोल्हापूर, पुणे बीडमध्ये दाखल होतील, असा दावा सुरेश धस यांनी केला. अनेक लोकांकडून 8 लाख रुपये घेतले असून पैसे घेतले यासाठी पुराव्याची गरज नाही, कारण मीडियासमोर ते पुरावे दिलेले आहेत, असे सुरेश धस म्हणाले.

हार्वेस्टर घोटाळ्यात दोन्ही आका सहभागी

शेतकऱ्यांना 40 लाख रुपयांची सबसिडी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 8-8 लाख रुपये घेतले. पण लोकांना सबिसिडी तर नाही, पण पैसेही परत मिळाले नाही. फसणवूक झालेल्यांपैकी काही लोक पैसे मागण्यासाठी आले असता, त्यांना बीडमधील एका हॉटेलमध्ये तसेच अन्य ठिकाणी त्यांन दम देऊन, मारहाण करून परत पाठवले, असा आरोपही सुरेश धस यांनी केला. या प्रकरणात आका आणि आकाचा आका दोघेही सहभागी आहेत, असाही दावा धस यांनी केला. हा करोडो रुपयांचा घोटाळा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे.

नेमका हार्वेस्टर घोटाळा प्रकरण काय?

ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास 140 शेतकरी मशीन धारकांना 40 लाखांचे अनुदान मिळवून देतो म्हणत वाल्मिक कराड आणि त्यंच्या सहकार्याने प्रत्येकी 8 लाख रुपये देण्यास सांगितले होते. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्ती असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्वांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी 14 सप्टेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गौप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आपल्याला आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+