डोक्यात गोळी लागून झालेल्या रक्तस्रावामुळे अक्षयचा मृत्यू, शवविच्छेदन अहवाल समोर
badlapur case akshay shinde encounter : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंगळवारी सकाळी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला होता. अक्षयच्या डोक्यात गोळी लागून झालेल्या रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथामिक शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. अक्षय शिंदे सोमवारी संध्याकाळी पोलीस चकमकीत ठार झाला होता,
मुंब्रा पोलिसांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली: एक अपघाती मृत्यूचा अहवाल आणि दुसरा खूनाचा प्रयत्न केल्याचा. बुधवारी दोन्ही अहवाल महाराष्ट्र सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
फॉरेन्सिक पथकांनी पीसीआर व्हॅनची तपासणी केली आणि मुंब्रा बायपासजवळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी रक्ताचे नमुने गोळा केले आणि चार कवच जप्त केले. मृत आरोपीच्या वडिच्यांवतीने हायकोर्टात केलेल्या याचिकेत पुरावे नष्ट केले जाऊ शकतात असे सांगत तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

बदलापूरमधील एका खाजगी शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना तो व्हॅन मध्ये शिवीगाळ करुन लागला आणि आक्रमक झाला आणि पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या गुन्ह्यात तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती पथकाने त्याला ताब्यात घेतले होते. अक्षय शिंदेचा व्हॅनमध्ये गोंधळ सुरु असताना सहाय्यक निरीक्षक नीलेश मोरे यांनी वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांना सावध केल्यानंतर ते मुंब्राजवळ थांबले आणि परिस्थिती चिघळवण्याच्या प्रयत्नात आरोपीला मागील सीटवर हलवले. पण आरोपी अचानक ओरडायला लागला, "मला परत का नेत आहात? मी आता काय केले? मला जाऊ द्या." असं म्हणत त्याने बंदूक हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.
सात तास चाललं पोस्टमार्टम
आरोपीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. अक्षय शिंदेचं मंगळवारी पोस्टमार्टम करण्यात आलं, जे सुमारे सात तास चाललं आणि त्याची व्हिडीओग्राफीही करण्यात आली आहे. पाच डॉक्टरांच्या समितीनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं शवविच्छेदन करून ठाणे पोलीस रवाना झाले. अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार देणारे मृत आरोपीचे नातेवाईक नरुग्णालयातून घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications