Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बदलापूरनंतर अकोल्यात जिल्हा परिषद शिक्षकाने 6 मुलींचा केला लैंगिक छळ, आरोपीला अटक

अकोला : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरळमध्येही असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे.

अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषद शिक्षकाने 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी शिक्षक आठवीत शिकणाऱ्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. मागील चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याचप्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पादेखील करायचा. काल संध्याकाळी याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदारविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola News

पीडित मुलींनी शिक्षकांचे वर्तन त्यांच्या पालकांना सांगितले. त्यानंतर आरोपीचे काळ कृत्य उघडकीस आले आहेत. त्यानंतर पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संताप जनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी तत्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तसेच याप्रकरणी सहा विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. सध्या हा आरोपी शिक्षकला पोलिसांनी अटक केली असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बदलापूर प्रकरणाची SIT गठित करण्याचे आदेश

बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूर येथे एका बड्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर शिपायाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर सात दिवसांनी आज जनक्षोभ उसळला आहे. या घटनेनंतर राज्यसरकार गंभीर दखल घेत असून दुसरीकडे बदलापूरमध्ये मोठे जनआंदोलन केले जात आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+