अक्कलकोटमध्ये भाजपच; सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा विजयी
Akkalkot Assembly Result 2024- अक्कलकोट हा महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा मतदार संघ. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ यांची भूमी म्हणजे अक्कलकोट.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात झालेली लढत अत्यंत लक्षवेधी होती. भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्या लढतीत सचिन कल्याण शेट्टी यांनी हा मतदार संघ सहज आपल्या खिशात घातला, आणि भाजपच्या खात्यात आणखी एका जागेची नोंद झाली. सचिन कल्याणशेट्टी यांना 1, 48,105 मते मिळाली तर त्यांचे विरोधी सिद्धराम म्हेत्रे यांना 98,533 मतांवर समाधान मानावे लागले.

धार्मिक स्थळामुळे राज्यात चर्चा
अलीकडच्या काळातील राजकारणात धार्मिक भावना आणि सद्भावना हा एक महत्त्वाचा विषय आहे. धार्मिक श्रद्धांना आव्हान देऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक राजकीय नेत्यांकडून केला जातो. अक्कलकोट ही स्वामी समर्थांची भूमी आहे. महाराष्ट्रातील लाखो भावी अक्कलकोटला येत असतात. श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द समर्थ भक्तांच्या मनात घर निर्माण करत असतो. यावेळी विधानसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती.
पत्रकाराची चूक मविआला पडली भारी
स्वामी समर्थ यांचा भक्त संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात वसलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई परिसरात एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोरच एका पुरोगामी पत्रकाराने श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. स्वामी समर्थांचा भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि त्यामुळे त्या पत्रकाराची चूक महाविकास आघाडीला भारी पडली.
अक्कलकोटला मंत्रीपदाची संधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे उमेदवार प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारी दिली होती. ही लढत चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने अत्यंत कमजोर निकाल दिले. त्यामुळे येथील निकालांच्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. त्यातही सचिन कल्याणशेट्टी हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. या परिसरात झालेल्या अनेक विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात सचिन कल्याणशेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मनमुराद कौतुक केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अखेरीस भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली. सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध पाहता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सचिन कल्याणशेट्टी यांनी मिळवलेला विजय सोलापूरची दशा आणि दिशा बदलून टाकणारा विजय आहे. कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून सोलापुरात विविध विकास कामे होतील असा स्थानिकांचा विश्वास आहे. हा विश्वास निर्माण करण्यात सिद्धराम म्हेत्रे अपयशी ठरले आणि त्यांना पुढील परिणाम भोगावे लागले.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications