दिल्ली विधानसभा लढविण्याचे अजित पवारांचे संकेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संचारला उत्साह

Ajit Pawar's press in Delhi- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुनियोजित केलेल्या बैठकीपूर्वी राष्ट्रावादी काँग्रेसेचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी राष्ट्रवादीचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत देत, कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.

Ajit Pawar

अजित पवारांना विरोधकांवर निशाणा

विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार यश मिळवले. महायुतीला 235 जागा मिळाल्या. त्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत बोलताना अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. फक्त विधानसभेलाच त्यावर प्रश्नचिन्ह यायला लागले. महाविकास आघाडीला आता कशावर आरोप करायचे ते समजेना. त्यामुळेच ईव्हीएमवर येऊन मुद्दा थांबत आहे.

आत्तापर्यंतचा ऐतिहासिक विजय

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात आत्तापर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात आत्ताएवढे यश सत्ताधाऱ्यांना कधीच मिळाले नव्हते. महायुतीने तब्बल 235 जागा मिळवल्या. यापूर्वी एकदा सत्ताधाऱ्याला 222 जागा मिळवता आल्या होत्या. मात्र लाडक्या बहि‍णींनी व शेतकऱ्यांनी हे रेकाँर्ड आमच्या नावावर केले. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानायला हवेत. मात्र आता विरोधकांना पराजयाचा कोणताच मुद्दा सापडत नसल्याने ते ईव्हीएमवर येऊन थांबले आहेत, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

महायुतीच्या नेत्यांची आज बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत आज महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीसाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सहभागी होणार आहेत. आजच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शहांसोबतच्या बैठकीचाही उल्लेख केला. महायुतीत कोणताही वाद नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. या बैठकीत मुख्यमंत्रीपद कुणाला व कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे याचीची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+