अजित पवार विधान परिषद निवडणूकीत मुस्लिम चेहऱ्याला उमेदवारी देणार ?

मुंबई : महाविकास आघाडीच्या विजयाचं गणित मांडताना मुस्लिम समाजाकडून मिळालेल्या पाठिंबा दुर्लक्षीत करता येत नाही. मुंबई , मराठवाडा असो की विदर्भ, महाराष्ट्रभर मुस्लीम व्होटबँक एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला .

Dcm Ajit Pawar

अजित पवारांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वादी व्होटबॅंक. ती अधिक भक्कम होत गेली. मात्र सेक्यूलर विचारांचा पुरस्कार करणाऱ्या अजित दादांच्या पक्षाला हे परवडणारे नाही. हिंदुत्वादी पक्षांसोबत गेलं तरी आपला सेक्यूलर चेहरा जपला पाहिजे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानपरिषद निवडणूकीत अजित पवार एक मुस्लिम चेहरा उमेदवणार म्हणून देणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या नेतृ्त्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली होती. या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा अल्पसंख्याक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना काही गोष्टी सुचवल्या होत्या महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लिम समाजासंदर्भात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्यं केली जात असल्याबद्दल अल्पसंख्याक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती.त्यासाठी भजबळांसह बाबा सिद्दीकी याचं नावंही चर्चेत आलं. मात्र पत्नी सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या पक्षात संधी मिळाली. आता विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सर्वात मजबूत दावेदार म्हणून ओळखले जाणारे गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलावले असल्याचे माहिती आहे.

मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका महायुतीला

मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला असे नव्हे. मुंबईत मुस्लिम बहूल भागात ठाकरेंच्या शिवसेनेला बंपर मतं मिळाली.शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मांडली.आगामी काळात हा धोका होऊ नये आणि पक्षाविरोधात मुस्लीम समाजात नेरेटीव्ह तयार होऊ नये ही काळजी अजित पवार घेतायत. आता मतदार त्याला कसं पाहतायत हे विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतरच कळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+