Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घरात फूट पाडू नका, मी चूक केली - अजित दादांची पुन्हा कबुली; म्हणाले- वस्ताद एक डाव राखून ठेवतो

Ajit Pawar Vs Sharad Pawar : गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी पुन्हा घरात फूट पाडल्यासंदर्भात चूक मान्य केली. घरात फूट पाडल्याने त्याचा त्रास होतो. लोकांना देखील ते मान्य नाही. असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला. जनसन्मान यात्रेत काल गडचिरोली येथे मंत्री बाबाराव आत्राम यांची मुलगी शरद पवार गटात जाणार व बापाविरोधातच निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले गेले. त्यावर अजित पवार यांनी मत व्यक्त करत शरद पवार गटातील नेत्यांवर निशाणा साधला.

अजित पवारांकडून कबुली

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केले. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Sharad Pawar

वस्ताद एक डाव राखून ठेवतो

धर्माराव बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरवलं आहे, अस बाबाने सांगितलं. ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणतेय, पण हे शोभतं का? तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका. मी तिला सांगू इच्छितो की, वस्ताद सगळे डाव शिकवतो. पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून मी सांगतो, तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा. त्यांना निवडून आणा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.

आम्ही विविध योजना आणल्या

आम्ही चांगल्या योजना जनतेला दिल्या आहेत. आम्ही मुलींसाठी एक योजना आणली. मुलीला 18 वर्षाची झाल्यावर 1 लाख रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना 3 हजारचं वाटप केलं. ज्या राहिल्या त्यांनी सुद्धा अर्ज करावा. त्याची काल मर्यादा वाढविली आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

गडचिरोलीत बाप-लेकीत होणार सामना

विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात उलाथापालथ व्हायला सुरुवात झाली. आहे. कोल्हापुरात समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एक मोठा प्रवेश शरद पवार गटात लवकरच होणार आहे. गडचिरोली अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरूद्ध लेक संघर्ष रंगणार आहे.

कधी होणार पक्षप्रवेश?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 11 किंवा 12 तारखेला जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गडचिरोलीचा दौरा करतील. त्यांच्या या गडचिरोली दौऱ्यात दोन बडे नेते प्रवेश करणार आहेत. धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर आणि त्याचे पती ऋतुराज हलगेकर हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मोठ्या प्रमाणाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जमण्याचा प्रयत्न सध्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांच्याकडून सुरू आहे. विधानसभा निवडणूक जवळ असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण सध्या तापलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+