Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"परिवार पुन्हा एकत्र येतोयं" पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षाशी युती! अजित दादांची मोठी घोषणा

Ajit pawar sharad pawar ncp alliance pimpri chinchwad pune : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

"परिवार पुन्हा एकत्र येत आहे," असे भावनिक उद्गार काढत त्यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवी समीकरणे मांडली जात असून, आता पुणे महानगरपालिकेतही हीच 'पॅटर्न' राबवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Ajit pawar sharad pawar ncp alliance

पिंपरी-चिंचवड: दादांची मोठी घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, रविवारी एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी सर्व शंका दूर केल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.

जागावाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात

दोन्ही गट आपापल्या चिन्हांवर (घड्याळ आणि तुतारी) निवडणूक लढवण्याची शक्यता असली तरी, जागावाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन दिवसांत अधिकृत उमेदवार यादी जाहीर होईल.

मविआ, भाजप-शिंदे गटाला धक्का

या युतीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र असून काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेलाही याचा मोठा फटका बसणार अशी चिन्हे आहेत.

📍 पुणे महापालिका: हालचाली आणि पेच
पिंपरी-चिंचवडमधील घोषणेनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्याकडे लागले आहे.

पुण्यात युतीचा प्रयत्न: पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाने पुण्यात महाविकास आघाडीच्या (मविआ) बैठकीकडे पाठ फिरवल्याने युतीची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पुण्यात युती होणार का?

पुण्यात युती फिस्कटण्याचे मुख्य कारण 'चिन्ह' असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाने सर्व उमेदवारांनी 'घड्याळ' चिन्हावर लढावे असा प्रस्ताव दिला होता, जो शरद पवार गटाने नाकारला आहे.

पुण्यातील युतीबाबतचा अंतिम निर्णय आज रात्रीपर्यंत होण्याची शक्यता असून, उद्या सोमवारी यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकते.

भाजपसमोर मोठे आव्हान

पवार काका-पुतणे एकत्र आल्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. "शहराच्या विकासासाठी आणि राष्ट्रवादीची ताकद टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत," असे मत दोन्ही गटातील स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+