Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजितदादांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या पराभवाची जबाबदारी

Mumbai: बारामती लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा झालेला पराभव आश्चर्यकारक आहे. निवडणूकीतील पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी, लोकसभा निवडणूक निकालानंतर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रात्री हॉटेल ट्रायडेंट येथे पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी लोकसभा निवडणूकीतील अपयशाबाबत भाष्य केले.

ajit pawar

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन 'आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचाय हे केलेले वक्तव्य लोकांना आवडले नाही.चंद्रकांत पाटील यांचे हे विधान आम्हाला महागात पडले असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच बारामतीत महायुतीमधील मित्र पक्षांनी मदत केली नसल्याबाबत अमोल मिटकरी यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

पुढे अजित पवार म्हणाले, राज्यातील निवडणूकीत संविधान बदलाचा मुद्दा कळीचा ठरला.भाजपच्या देशातील काही खासदारांनी संविधान बदलाच्या केलेल्या विधानामुळे दलित समाज दुरावला तसेच विरोधकांनी केलेल्या अप्रचारामुळे यंदा मुस्लिम समाजाची मते राष्ट्रवादीला मिळाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच या निवडणूकीत झालेल्या चुका आम्ही दुरुस्त करू तसेच जनतेचा विश्वास संपादन करून आगामी काळात निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला पाच आमदार गैरहजर

लोकसभा निवडणूकीनंतर राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ट्रायडेंट येथे बैठक बोलावण्यात आली होती. परंतु या बैठकीला पक्षातील पाच आमदार गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

बुधवारीच शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षाचे १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर या आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दुसरीकडे शिंदे यांचे काही आमदार उद्धव यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

कोणताही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कोणताही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आम्ही सर्व एकसंध असून त्याच ऐक्याने भविष्यात वाटचाल करणार असल्याची या दोघांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+