राजकीय भूकंप! पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणी अजित पवारांची मोठी कबुली; काय म्हणाले ते? 4 मुद्यात वाचा
Ajit Pawar on Mundhwa Land Scam Admits Mistake, Defends Parth Pawar : महायुती सरकारच्या अडचणी वाढवणाऱ्या आणि विरोधी पक्षांनी जोरदार टीकेचे लक्ष्य बनवलेल्या मुंढवा व बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर मौन सोडले आहे. पुत्र पार्थ पवार यांचे नाव या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर, अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत अत्यंत सावध भूमिका घेतली. त्यांनी हा जमीन व्यवहार 'चुकीचा' असल्याचे स्वीकारले.
असे असले तरीही त्याचवेळी त्यांनी "अननुभवातून चूक झाली," असे म्हणत आपला मुलगा पार्थ पवार यांची पाठराखण केली. अजित पवारांच्या या 'कबुली' आणि 'पाठराखणी'च्या संमिश्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे, कारण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता उच्चस्तरीय समितीद्वारे होणार आहे.

अजित पवार नेमके काय म्हणाले? खास 4 मुद्दे
1. व्यवहार चुकीचा असल्याची कबुली
'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुंढवा येथील जमीन व्यवहार चुकीचा होता. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांमार्फत अभ्यास करणे आवश्यक होते, पण या व्यवहारात ती खबरदारी घेण्यात आली नाही. त्यांना माहिती असती, तर त्यांनी हा व्यवहार होऊ दिला नसता.
2. पार्थ पवारांची पाठराखण
अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार याची पाठराखण केली. ते म्हणाले की, "शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल." विश्वासू लोकांवर अवलंबून राहून असे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा न करता करायचे नसतात.
3. आर्थिक देवाणघेवाण नाही
कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारात एका रुपयाचीही देवाणघेवाण झालेली नाही, तसेच विक्रेत्याला कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत आणि जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
4. खरेदीखत नोंदणीवर आश्चर्य
'खरेदीखत करायला नको होते, पण ते कसे करण्यात आले, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे,' असे अजित पवार म्हणाले. या प्रकरणातील सत्य चौकशी समितीच्या अहवालातून समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाचे मुद्दे
कारवाईची मागणी: ही जमीन शासनाची होती, त्यामुळे नोंदणी अधिकाऱ्यांनी हा व्यवहार थांबवायला हवा होता. यात दोषी आढळलेल्या तीन लोकांवर कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
नियमांवर भर: अजित पवार यांनी 'मी नियमाने काम करणारा कार्यकर्ता आहे' असे स्पष्ट केले. कितीही जवळचा नातेवाईक असला तरी नियमाच्या बाहेर जाऊन काम करू नका, असे निर्देश प्रशासनातील अधिकाऱ्यांना देऊन ठेवले असल्याचे ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications