अजित दादांचा स्वॅगच न्यारा; उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट 17 इच्छुकांना दिले AB फॉर्म!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर रविवारी भापजची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. यात 99 नावांचा समावेश आहे. तर आज रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोमवारी 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यांना मिळाला एबी फॉर्म?
मिळालेल्या माहितीनुसार, एबी फॉर्म मिळणाऱ्यांमध्ये राजेश विटेकर - परिषद आमदार (इच्छुक), संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके आदींचा समावेश आहे.

भाजपमधून आलेल्या गावितांना संधी
भरत गावित हे आधी भाजपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भरत गावित यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता. आता भरत गावित यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत.
अजित गटाची यादी आज जाहीर होणार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषझा झाली असून 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे अजित पवार यांनी ए बी फॉर्मचे वाटप सुरू केल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी विद्यमान आमदार एबी फॉर्म घेऊन जात आहेत. यावेळी संजय बनसोडे, चेजन तुपे, सुनील तटकरे आदी उपस्थित होते. या सर्व हालचालींवरून अजितपवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याने संकेत मिळत आहेत.












Click it and Unblock the Notifications