राजकारणातील सर्वात मोठी घडामोड;शरद पवारांच्या भेटीला अजित पवार- सुनेत्रा पवार दाखल, बैठकीत काय ठरलं

Ajit Pawar meet Sharad Pawar wished him on his birthday : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत असून दिल्लीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते तथा आमदार छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील पोहोचले आहेत.

Ajit Pawar meet Sharad Pawar

कालपासून सुरू होती चर्चा, आज भेटीला दाखल

शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का? याची कालपासून चर्चा होती. मात्र, हे सर्व नेते दिल्लीत असल्यामुळे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

तर या चर्चांना देखील पुष्टी मिळाली आहे. अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले.

निवडणुकीनंतर पहिलीच भेट

विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. इतकेच नाही तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पवारांच्या घरी पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.

पक्षफुटीनंतर कुटुंबात मोठी कटुता

शिवसेनेतील फुटीनंतर मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसोबत 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.

तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली. पवार कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका-टीप्पणी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याचे दिसून आलेली आहे. दरम्यान, आजच्या भेटीने पवार कुटुंबात पुन्हा दिलजमाई होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय - अजित पवार

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. परभणी येथील प्रकरण, राज्यसभेतील चर्चा आदी जनरल विषयावर आमच्यात चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. आज शरद पवार साहेबांचा तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीृवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

शरद पवारांची भेट त्यानंतर काय म्हणाले छगन भुजबळ?

शरद पवार यांच्यासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहोत. तेव्हापासून दरवर्षी आम्ही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो. त्यात खंड पडू देणार नाही. तसे या वर्षी देखील शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. शरद पवार यांच्या विषयी आमच्या मनात अजूनही प्रेम आणि आदर कायम आहे, असे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+