Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवार यांची पुन्हा जीभ घसरली; म्हणाले- 'पेट्रोल चोरून ​​धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले'

Ajit Pawar controversial statement on Dhirubhai Ambani : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडकपणे बोलण्यामध्ये सर्वपरिचित आहेत. त्यामुळे अनेकदा बोलता बोलता त्यांची जीभ घसरते आणि ते टीकेचे धनी बनतात. धरणात कुठून आणू पाणी असे म्हणत त्यांनी एकदा बेताल विधान केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांची जीभ घसल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील साखर कारखान्याच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी एक विधान केले अन् त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे.

Ajit Pawar on dhirubhai Ambani

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केला. व त्यांनी त्यांनी जोरदार टोला देखील लगावला.

अजित पवारांची कुठे होती सभा!

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. तर ते स्वत: देखील यात अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात पाहुणेवाडी येथे आयोजित एका सभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. तोच व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केला अन् अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार काय म्हणाले व्हिडिओत?

अजित पवार यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ ते बोलताना म्हणाले की, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले. मला सहकार टीकवायचे नसते, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? काही का होईना, माझ्या गोरगरिबांची मुले तिथे लागली ना कामाला. पंपावर काम करणे कमीपणाचे नाही. पंपावरच पेट्रोल चोरी करून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले. त्यामुळे पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे. मिळेल त्या कामातून आपण सोने तयार केले पाहिजे.

मी सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खासगी कारखाना काढण्याची तयारी नव्हती. सरकारने बंधने घातली. पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

अंजली दमानिया यांनी काय केली टीका?

अजित पवार हे सभेला संबोधित करित असताना त्यांच्या बोलण्याच्या वेगातच त्यांच्याकडून हे विधान निघाले असावे, असाही अंदाज वर्तविला जात आहे. अजित पवार यांनी उपस्थितांना कामाचे महत्व पटवून देण्यासाठी असे विधान केले. पण त्यावरून आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला आहे.

अजित पवारांच्या या विधानावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट केला. अंजली दमानिया यांनी या पोस्टद्वारे अजित पवारांना घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून आपण काय केलेत?, असा खोचक सवाल देखील अंजली दमानिया यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+