अडचणीतील धनंजय मुंडेंमागे अजित पवार ठाम; एवढ्या आरोपानंतरही दिली 'ही' जबाबदारी

संतोष देशमुख हत्येप्रकरणांनंतर अनेक आरोप झालेल्या व विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान दिले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Dhananjay Munde

कोअर ग्रुपमध्ये कोण कोण?

कोअर ग्रुपमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे प्रमुख म्हणून राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, आ. दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कोअर ग्रुपमध्ये समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षसंघटनेची बांधणी, महत्वाच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणे याची जबाबदारी सदस्यांवर असणार आहे.

अजितदादांची सौम्य भुमिका

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन काही पुरावे सादर केले आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावाच, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तरीही अजित पवारांनी मुंडेंना पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अजितदादांनी पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंना स्थान दिल्याने ते मुंडेंवर मेहरबान असल्याचे दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+