"मिमिक्री केल्याने माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत"; राज ठाकरेंच्या टिकेला अजित पवारांचा खोचक टोला
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली 'मिमिक्री' आणि टीकेला शांत परंतु थेट खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले अजित पवार?
'मी काम करणारा माणूस आहे आणि कामावरच लक्ष केंद्रित करणार,' असे स्पष्ट करत त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला महत्त्व देण्यास नकार दिला. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांची नक्कल केली होती.

'मिमिक्री करणारे करत राहतील, माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत'
बुधवारी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. पत्रकारांनी अजित पवारांना या मिमिक्रीबद्दल विचारले असता, त्यांनी अत्यंत शांतपणे आणि कठोरपणे उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, "कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. पण मी काम करणारा माणूस आहे. मी काम करत राहीन."
तावातावाने पक्ष काढून संपूर्ण महाराष्ट्रात एकही आमदार निवडून न आणू शकणाऱ्यांनी किमान दादांना तरी शहाणपणा शिकवू नये.
— अजितपर्व (@AjitParv) October 16, 2025
दादांची ओळख त्यांच्या कामातून आहे,
बाकी ज्यांना काही कामं उरली नाहीत त्यांनी मिमिक्री केल्यास काही हरकत नाही.@AjitPawarSpeaks pic.twitter.com/k7bsXGTqlf
आपल्या कामावर आणि शासकीय निर्णयांवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे दर्शवत, त्यांनी सरकार शेतकऱ्यांसंदर्भात घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला. तसेच, या वादात न पडण्याची भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले, "मिमिक्री कोण करते? मग मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यानंतर तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्न विचारणार की, अजित पवार तुम्हाला असे म्हणत होते. मला या सगळ्यात पडायचे नाही."
राज ठाकरेंनी काय केली होती मिमीक्री?
निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आले होते. या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी अजित पवारांची आठवण काढली. ते म्हणाले की, मी २०१७ मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. तेव्हा निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे, कुणासोबत होणार हे महत्त्वाचे नाही, हेच मी बोलत होतो.
राज ठाकरे ने की अजित पवार की मिमिक्री #RajThackeray #AjitPawar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #hindinews #vsrsnews #lalbabugupta pic.twitter.com/nnMQtE4zkJ
— VSRS Newsᅠᅠ (@VsrsN) October 16, 2025
यावेळी त्यांनी अजित पवारांची नक्कल करत म्हटले की, "त्यावेळी काँग्रेससुद्धा होती. तसेच अजित पवारही होते. खरेतर त्यांनी आज आमच्यासोबत यायला हवे होते. कारण, त्यावेळी ते खूप तावातावाने बोलत होते. ते सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगत होते." अशाप्रकारे राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली.












Click it and Unblock the Notifications