अजितदादांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला, पण राजन पाटील शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन दादांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. हे पद देऊन तीन ते चार दिवस होत नाही, तोच राजन पाटील आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बैठीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर गेले.

अजित पवारांची नुकतीच झाली होती सभा

मुळात काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राजन पाटील यांच्या मोहोळमध्ये सभा घेत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. राजन पाटील यांना विरोध करणाऱ्या उमेश पाटील यांना अजित पवारांनी जोरदार झापलं होतं. असे असताना देखील राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी आल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Rajan Patil meets Sharad Pawar

माजी आमदार रमेश कदमही पवारांच्या भेटीला

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी अकलूज येथे दाखल झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढावी. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना मोहोळमधून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास मी मोहोळमधून तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असंही रमेश कदम यांनी सांगितले आहे.

इंदापूरमधील नेते मंडळीही मोहिते पाटलांच्या बंगल्यावर

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील नको म्हणणारे आप्पासाहेब जगदाळे, दशरथ दादा माने आणि इतर मंडळीही शिवरत्न बंगल्यावर पोहोचली आहेत. सकाळी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याशी बैठक करून हर्षवर्धन पाटील नको. ही भूमिका मांडल्यानंतर पुन्हा अकलूजमध्येही हर्षवर्धन पाटील विरोधक पोहोचल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटलांसमोर दिलेला शब्द पाळावा हीच आमची मागणी असून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांना शरद पवार गटात यायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी अधिक काम करावे आणि नंतर उमेदवारीवर दावा करावा अशी भूमिका आप्पासाहेब जगदाळे यांनी बोलून दाखवली आहे.

राजन पाटील म्हणाले- भेट घेणे गैर काय?

शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय? असा सवाल राजन पाटील भेटीसाठी पोहोचल्यानंतर केला आहे. जरी मला अजित पवारांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे. लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केले असा गौप्यस्फोटही राजन पाटील यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+