Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांचा Ncp युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना दणका! लातूर मारहाण प्रकरणी पद गमावलं

Ajit Pawar directs Suraj Chavan to resign from post :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यापुढे मागणीचे निवेदन घेऊन जात छावा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना घेऊन छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यात संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत, अशातच सर्वपक्षीयांकडून 21 जुलै रोजी लातूर बंदची हाकही देण्यात आली आहे.

या धर्तीवर आता टीकेचा भडिमार सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण या आपल्याच पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षावर मोठ्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Ajit Pawar directs Suraj Chavan to resign

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले, "काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो."

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या."

अजित दादांचा सुरज चव्हाणला दणका

काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.

काय घडला होता प्रकार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. पक्ष कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद संपताच अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी तटकरे यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना पत्ते भिरकावले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात गेम खेळत असल्यावरून छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची करत होते. त्यांनी तटकरे यांच्यापुढे जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि इतर दोन सहकाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घाडगे पाटील हे आपल्या समर्थकांसह जुने विश्रामगृह येथे बसले होते. त्यावेळी मारहाण झाली. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. या मारहाणीत छावाचे विजयकुमार घाडगे पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आज लातूर बंद

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला झालेली ही मारहाण असल्याची प्रतिक्रिया घाडगे पाटील यांनी दिली. तर आमच्या प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना असवैधानिक भाषा वापरल्याने मारहाण केल्याचे समर्थक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलं होतं. या घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि आज त्यांनी औसा रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनरही फाडले. या मारहाणीचा निषेध करीत सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्यासह विरोधी पक्षातील काँग्रेस पक्षाने तसेच विविध संघटनांनी 21 जुलै रोजी लातूर बंदचे आवाहन केलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+