पवार साहेबांनी घरात फूट पाडली, मी केलेली चूक त्यांनी देखील केली; अजितदादा बोलताना भावूक झाले
Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते म्हणाले की, शरद पवार यांनी कुटुंबात फूट पाडली आणि त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. यापूर्वी माझ्याकडून चूक झाली होती, पण आता इतर लोक (शरद पवार) सुद्धा चुका करत आहेत असे दिसून येत आहे.
अजित दादा म्हणाले की, राजकारण इतक्या खालच्या पातळीवर आणू नये, कारण पिढ्यानपिढ्या एकत्र यायला वेळ लागतो आणि कुटुंब तोडायला एक क्षणही लागत नाही, असे म्हणत ते भावूक देखील झाले.

बारामतीत काका-पूतण्याची लढाई
बारामतीत काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा सद्या रंगली आहे. तर दुसरीकडे आज बाराशरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी तर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी देखील अर्ज भरला. याप्रसंगी अजित पवार यांनी केलेल्या सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी एकदा चूक केली तिच चूक पुन्हा शरद पवार यांनी देखील केली आहे. घरात फूट पाडण्याचे काम साहेबांकडून झाले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अन् सभेत एकच हशा पिकला
लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हतं द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रियाला मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा.. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा, असे म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला. तर सभेला असलेल्या लोकांमध्ये हशाच पिकला.
तुम्हाला काय सांगू माझंच घर नीट नाही
अजित पवार म्हणाले की, शिरुरला उभा राहा म्हणून मला आग्रह केला जात होता. परंतु, बारामतीच्या लोकांनी त्यादिवशी जास्त आग्रह केला म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रत्येकाने आपापल्या गावात जा, दुसऱ्याच्या गावात जाऊ नका. आपापले घर सांभाळा मी तुम्हाला हे का सांगतोय कारण माझंच घर नीट नाही. म्हणून मला भीती वाटते बोलताना, तुम्ही तिकडे गेल्यावर मला त्रास होतोय, अशी भावनिक सादही बारामतीकरांना अजित पवारांनी घातली.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications