महायुतीचं टेन्शन वाढलं, MIM मविआत येणार? जलिलांची ऑफर, जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितलं...
Imtiaz jaleel : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी भ्रमात राहू नये. विधानसभेत पराभव झाला, तर आमच्यावर खापर फोडू नका. एमआयएमला मविआत सोबत घ्या, अशी थेट ऑफर इम्तियाज जलिल यांनी बुधवारी महाविकास आघाडीला दिली. जलिल यांच्या या थेट ऑफरनंतर महायुतीचं टेन्शन वाढलं.
जलिल यांच्या ऑफरचा मविआने विचार केला, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, शेतकरी कामगार पार्टी, समाजवादी पक्ष आणि आता एमआयएम असे एकूण सहा पक्ष एकत्र येणार आहेत. ही आघाडी महायुतीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे...

जरांगे यांच्यामुळे माझा पराभव
इम्तियाज जलिल यांनी बुधवारी संभाजी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, लोकसभेला एकटा लढूनही मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. जरांगे फँक्टरमुळे माझा पराभव झाला. मला पडलेली मते पाहिली तर जिल्ह्यात एमआयएमचं महत्त्व कळतं. मी अद्याप शरद पवारांची भेट घेतलेली नाही. पण आम्ही महाविकास आघाडीत जाण्यास तयार आहोत. मी अनावश्यक मागण्या करणार नसल्याचंही, जलिल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मविआला त्यांच्यात घेण्याची थेट ऑफर इम्तियाज जलिल यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, लोकसभेच्या भ्रमात राहू नका. एमआयएमचे महत्व ओळखा. मी चर्चेला यायला केव्हाही तयार आहे. पण तुम्ही नकार दिला तर पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका. २९ ऑगस्टला आमचा विधानसभेचा आराखडा तयार होईल. आम्ही ३० जागांची चाचपणी केली आहे. मी स्वतःही विधानसभा लढविणार असल्याचेही जलिल यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जलिल यांच्या विधानावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं. जयंत पाटील म्हणाले, इम्तियाज जलिल आमच्यासोबत यायला तयार आहेत. ते वैयक्तीक कुणाशी बोललेले नाहीत. मात्र आम्ही तिन्ही पक्ष व मित्रपक्षांना विचारून निर्णय घेऊ. जयंत पाटील यांनी एमआयएम बरोबर युती करण्यास एक प्रकारे हिरवा कंदीलच दाखवला.
जयंत पाटलांनी एमआयएमबाबत अनौपचारिक हिरवा कंदील दाखविल्यानंतर मात्र महायुतीचं टेन्शन वाढणार आहे. राज्यात विशेषतः मुस्लिम बहुल मोठ्या शहरातील एमआयएमची ताकद बघता, महायुतीला हिंदू वोट बँकेला बुस्टर द्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीत सहा पक्ष एकत्र आल्यास आगामी विधानसभा महायुतीसाठी अवघड जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications