मोठी बातमी: रीलसाठी जीव धोक्यात, अहिल्यानगरमध्ये फाशीचा बनाव केला अन् झाला अनर्थ...

सोशल मीडियाच्या वाढत्या क्रेझमुळे तरुणाईमध्ये प्रसिद्धी मिळवण्याची धडपड दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. मात्र, प्रसिद्धीच्या या हव्यासामागे अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागतात.

ahmednagar reel accident


असाच एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडला आहे. रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने फाशीचा बनाव करताना चक्क आपला जीव धोक्यात घातला आणि तो प्रत्यक्ष फासावर लटकला.

प्रकाश बुडा असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. सध्या तो जामखेड शहरात एका हॉटेलमध्ये काम करतो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने "फाशी घेतोय" असं दाखवणारं रील चित्रीत करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्याने मोबाईल कॅमेरा सुरू ठेवून फासाची सेटिंग केली होती. पण, रीलसाठी केलेली 'एक्टिंग' काही क्षणांतच वास्तवात बदलली. दोरी खऱ्या अर्थाने गळ्यात अडकली आणि प्रकाशची शुद्ध हरपली. काही क्षणांतच तो फासावर लटकला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत प्रकाशला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या तत्परतेमुळे प्रकाशचा जीव सध्या तरी वाचला आहे, मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

ही घटना केवळ एक दुर्घटना नाही, तर एक इशारा आहे. आज सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणी कोणत्याही थराला जातात. अलीकडच्या काळात स्टंट करताना, रेल्वे ट्रॅकवर रील चित्रीत करताना, उंच इमारतींवर चढून फोटो घेताना अनेक तरुणांनी जीव गमावले आहेत.

संजय कोठारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "हे वय खेळणं-शिकण्याचं आहे, पण सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून तरुण जीवाला धोक्यात घालतात. प्रसिद्धीपेक्षा प्राण महत्त्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा स्टंट्सना त्वरित थांबवणं आवश्यक आहे."

पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली असून सोशल मीडियासाठी धोकादायक प्रकारचे कंटेंट शूट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.

ही घटना फक्त अहिल्यानगरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही याचे पडसाद उमटले पाहिजेत. समाज माध्यमांच्या वाईट परिणामांवर जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+