Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्यांना पिक विम्याचे 853 कोटी रुपये मिळणार, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जनसन्मान यात्रा दौऱ्यानिम्मित नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी, मंत्री छगन भुजबळ , पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचं मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde

जनसन्मान यात्रा निम्मित नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली.

नाशिक जिल्हातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित असल्याची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले. कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले , त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता, त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते आणि त्याच्या वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर आज कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+