Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुरोगामी कोल्हापुरात अघोरी पूजेचे कांड! महिला-पुरुष स्मशानभूमीत घुसले नग्नअवस्थेत; अन् राखेत दिसलं..

Aghori worship in Kolhapur News : महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा तर पुरोगामी विचारांचा पाया रचणारी भूमी. कर्मकांडाला थारा न देणारी भूमी कोल्हापूर नगरी मात्र सद्या एका अघोरी पूजेच्या कांडामुळे बदनामी होऊ लागली आहे. होय, हे अगदी सत्य आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यात भानामती, काळी जादूचे अनेक घटना किंवा प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. अशातच भयंकर प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावच्या वैकुंठधाममध्ये एक अघोरी कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही दिवसांपासून एक महिला आणि एक पुरूष भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार करत आहेत. नग्न अवस्थेत हा पुरुष अन् महिला स्मशानभूमीत जात आहेत, या सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे उदगाव आणि जयसिंगपूर भागातील परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aghori worship in Kolhapur

स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा गोळा करताना त्यांना काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केल्याचं दिसून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत्यूनंतरही राखेवर भानामती करता येते का, नेमकं असं कोणी केलं, याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे नातेवाईक संतापले, त्यांनी ग्रामपंचायतीकडे स्मशानाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले.

भयंकर प्रकार आला उघडकीस..!

राखेच्या ठिकाणी असा प्रकार घडल्यानंतर नातेवाईक संतापले. स्मशानभूमीत देखील हा खोडील प्रकार कोणी केला. यामागे उद्देश काय होता, असा सवाल उपस्थित करून नातेवाईकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सीसीटीव्ही चेकिंग केल्यानंतर धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला. यामध्ये एक महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.

अमावस्या, पौर्णिमा अन् भरदिवसा आले नग्नअवस्थेत!

दरम्यान, सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे सदर नग्न अवस्थेत आलेली महिला व पुरुष हे दोघेही वेगवेगळ्या वेळी स्मशानभूमीत आल्याचं दिसून आलं. आमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+