एकीकडे जरांगेंचे आमरण उपोषण, दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी थेट तहसीलदारांची खूर्चीच पेटवली

मराठा आरक्षणासाठी सद्या मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तर काही ठिकाणी मराठा आंदोलक आता आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

अशीच काहीशी धक्कादायक व आंदोलक आक्रमक झाल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. मराठा आंदोलकांनी थेट तहसीलदारांची खूर्ची दालनाच्या बाहेर आणून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने काही काळ फुलंब्री तहसीलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Maratha reservation

..तर आगामी काळात लढा आक्रमकतेचा इशारा

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8 वा दिवस आहे. पण सरकारने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. तर आगामी काळात याहून अधिक आक्रमकपणे समाजबांधव होतील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण त्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यासंबंधी आंतरवाली सराटी येथून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे प्रत्युत्तरादाखल उपोषण सुरू केले आहे. त्यांच्याही आंदोलनाला संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. वडीगोद्री हे आंतरवाली सराटीला जाणाऱ्या रस्त्यातच आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठा व ओबीसी आंदोलक समोरासमोर येण्याच्याही घटनाी घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+