Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईनंतर आता पुण्यातही आढळा कोरोना रुग्ण; प्रशासन सतर्क,

मुंबईनंतर पुण्यातही 2025 चा पहिला कोरोना रुग्ण आढळून आला असून, शहरात पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय वृद्ध पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे.

corona in pune

सद्यस्थितीत मुंबईत एकूण 53 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, 19 मे रोजी मुंबईत एकही नवीन रुग्ण सापडला नव्हता. मात्र, पुण्यातील नवीन रुग्णामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून, स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबईतील उपचार व्यवस्था सज्ज

राजधानी मुंबईत बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये कोविडच्या उपचारांसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात 20 MICU खाटा, गरोदर महिला व बालकांसाठी 20 खाटा आणि 60 सामान्य खाटा सज्ज आहेत. कस्तुरबा रुग्णालयात 2 ICU खाटा व 10 खाटांचा एक वॉर्ड कार्यरत असून, गरज पडल्यास या सुविधांची संख्या त्वरित वाढवली जाणार आहे.

आशिया खंडात पुन्हा वाढती चिंता

दरम्यान, दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेषतः हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, या दोन्ही ठिकाणी घनदाट लोकवस्तीच्या भागांमध्ये संक्रमण झपाट्याने वाढत आहे.

सिंगापूरमध्ये 28% वाढ; सरकारकडून सतर्कतेचा इशारा

सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोविड रुग्णसंख्येत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला असून, नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याची वाढती लाट 2020 च्या तुलनेत अधिक वेगाने फैलावत असल्याने अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+