Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केस-नख गळतीनंतर आता हाताला पडताहेत भेगा!, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात आजाराचे थैमान,लोकांमध्ये दहशत

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विविध आजारांना लोकांना सामोरे जावे लागत आहेत. अचानक केस गळणे, टक्कल पडणे त्यापाठोपाठ बोटांची नखे गळून जाणे यांसारख्या गूढ आजाराने थैमान घातले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यात सुरुवातीला या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. या आजारासंदर्भातील गुढ उकलण्याचे काम सुरू आहे, त्याचा रिपोर्ट देखील अजून आलेला नाही. अशातच, आता याच जिल्ह्यात आता नवीन आजाराने डोकेवरं काढले आहे. ते म्हणजे अचानक गावागावातील लोकांच्या हातांना भेगा पडू लागल्या आहेत.

या अचानक व गूढ असलेल्या आजारामुळे मात्र नागरिक भयभीत झाले आहेत. तर आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. खामगाव, शेगाव नंतर आता चिखली व मेहकर या तालुक्यातील गावांमध्ये देखील या आजाराचा शिरकाव झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासर्व घटनेमुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

buldhana news

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या गावातच रुग्ण!

मेहकर तालुक्यात आता हाताला भेगा पडण्याच्या आजाराची नवीन लक्षणे समोर आली आहेत. विशेषतः शेलगाव देशमुख या गावातील सुमारे 20 ग्रामस्थांनी अशा प्रकाराच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या.

हा प्रकार केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातील गावात आढळून आल्याने आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने शेलगाव देशमुख येथे भेट देत बाधित नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी केली आहे.

नेमका काय घडलाय प्रकार!

आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीत एकूण 20 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये इसबगोल (एक्झेमा, पाल्मोप्लांटर केराटोडर्मा किंवा पाल्मोप्लांटर सोरायसिस) या प्रकारच्या त्वचा विकारांची लक्षणे आढळून आली आहेत. हे रुग्ण मागील 12 महिन्यापासून त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी बहुतेक रुग्णांवर बुलढाणा आणि अकोला शहरातील त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचारही सुरू अल्याचे समोर आले.

त्वचाविकाराचा पाण्याशी संबंध आहे का?

मिळालेल्या माहितीनुसार, या त्वचाविकाराचा पाण्याशी कोणताही संबंध नसून, तो संसर्गजन्यही नाही. हा विकार मुख्यतः शरीरातील स्वयंप्रतिकारक प्रणालीच्या कारणाने उद्भवतो, जेव्हा शरीर विशिष्ट प्रतिजन किंवा हानिकारक रसायनांच्या संपर्कात येते.

तपासणीनंतर सर्व रुग्णांना तसेच स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराबाबतची सविस्तर माहिती, योग्य उपचार पद्धती आणि आवश्यक काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

डिसेंबर महिन्यापासून टक्कल आजाराने लोक त्रस्त!

गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळण्याच्या प्रकारांनी नागरिक हैराण झाले होते. केस गळल्यानंतर काही रुग्णांच्या नखांना विद्रूप स्वरूप येऊ लागले आणि ती कमजोर होऊन गळून पडू लागली. अनेक रुग्णांमध्ये नखे पूर्णपणे गळून गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.

आयसीएमआरच्या रिपोर्टची अजूनही प्रतीक्षा!

यासोबतच रुग्णांमध्ये तीव्र थकवा आणि चिडचिडेपणाही दिसून येत होता. या सगळ्या प्रकारानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (ICMR) पथकाने संबंधित भागाचा दौरा करून विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. मात्र, या प्रकरणाचा अहवाल अद्याप लालफीतशाहीत अडकलेला असून, तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+