Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहि‍णींसाठी पैसा आणला कोठून..? मंत्री आदिती तटकरेंनी केलं 'हे' महत्त्वाचं विधान

गेल्या विधानसभा निवडणुकीत जी गोष्ट टर्निंग पाँईंट ठरली, ती होती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. आता याच योजनेचा डिसेंबरचा हप्ता सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मिळायला सुरुवात झाली आहे. या योजनेला पैसा येतो कोठून..? इतर योजनांचा निधी वळविलाय का..? ही योजना सुरु राहील का..? या विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना मंत्री आदीती तटकरे यांनी उत्तर दिले आहे.

Aditi Tatkare

डिसेंबरचा हप्ता आला

लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरता जुमला आहे, असा आरोप निवडणुकीपूर्वी झाला. त्याला महायुतीनेही लगेच उत्तर दिले. मात्र आता निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता २४ तारखेपासून येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत अनेक महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा झाले. लाडकी बहिण योजना ही फक्त निवडणुकीपुरती नव्हती, हे महायुती सरकारने दाखवून दिले आहे.

काय म्हणाल्या तटकरे?

विरोधकांनी या योजनेवरुन सरकारची चांगलीच कोंडी केली होती. निवडणुकीच्या काळात या योजनेला पैसा कोठून येणार, असे प्रश्नही विचारण्यात आले होते. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत उत्तर दिले. त्या म्हणाल्या, नागपूरच्या अधिवेशनात या योजनेच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातूनच डिसेंबरचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या कोणत्याही योजनेचा निधी या योजनेकडे वळविलेला नाही. यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाचे मंत्री त्यांच्या विभागाच्या निधीचा खर्च करतात. आम्हाला यासाठी स्वतंत्र निधी देण्यात आला आहे.

२१०० रुपये कधी?

निवडणुकीपूर्वी लाडक्या बहि‍णींचा हप्ता हा १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा, एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी केली होती. त्यामुळे २१०० रुपये हप्ता कधीपासून सुरु होणार, हा प्रश्न सध्या लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. मात्र यावर अद्याप कोणतीच अपडेट देण्यात आलेली नाही. कदाचित पुढच्या अर्थसंकल्पात यावर स्वतंत्र निधीची तरतूद करुन वाढील हप्ता मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेच्या निधीसाठी शिक्षकांचे पगार रखडल्याची बातमी समोर आली होती. याबाबतही तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. त्यांचेही पगार वेळेत होतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+