लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा हप्ता 'या' तारखेला मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी तारीखच सांगितली

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे देखील स्पष्ट केले. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार हे सांगितलं आहे. शिवाय 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतून 80 लाख महिला वगळल्या जाणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Majhi Ladki Bahin Yojna

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे पैसे कधी?

8 मार्च रोजी शनिवार असून देखील सर्व महिलां लोकप्रनिधींसाठी आणि महिलांसाठी देखील सभागृहात विशेष सत्र होणार असल्याची माहिती देत मंत्री अदिती तटकरे यांनी 'लाडकी बहीण' योजनेबद्दल देखील मोठी घोषणा केली. शिवाय 'लाडक्या बहिणींना' फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार याची देखील त्यांनी माहिती त्यांनी दिली.

आदिती तटकरे म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता 8 मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या खात्यात जमा होईल. साधारण 5 - 6 मार्च पासून संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही 8 मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत.

विरोधकांनाही लगावला टोला

आदिती तटकरे यांनी योजनेतील महिलांची नावे वगळली जाणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपावर देखील उत्तर दिले. विरोधक सुरुवातीपासून आरोप करतच आहेत. आम्ही जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा दोन कोटींपेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेऊ शकल्या आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहे, त्या त्याचप्रमाणे राहतील. योजना जाहीर झाल्यापासून ही योजना विरोधकांना खुपत आहे आणि गेल्या 5 - 6 महिन्यांपासून ज्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद मिळत आहे, तो पाहिल्यानंतर विरोधकांमध्ये नैराश्य निर्माण झालं आहे. तेच नैराश्य विरोधक बहिणींमध्ये पसरवताना दिसत आहे. पण महायुतीचं सरकार सक्षम आहे, असेही त्या म्हणाल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+