Sayaji Shinde Joind NCP : अभिनेते सयाजी शिंदे यांचा NCPत प्रवेश, छगन भुजबळ म्हणाले- तुमचा डबल...
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी आज मुंबईत प्रवेश केला.
सयाजी शिंदे गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अनेक वर्ष सयाजी शिंदे राजकारणात उतरतील अशा चर्चा होत्या अखेर विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले- तुमचा सन्मान होईल
नाव जरी मराठी असलं तरी अभिनयाचा ठसा त्यांनी महाराष्ट्रात आणि दक्षिण भारताच्या सिने सृष्टीत उमटवला आहे. अभिनेते तर आहे, आता उद्या ते नेते सुद्धा होणार आहे. लोकांचं दु : ख कसं कमी होईल, त्यासाठी त्यांना काम करायचं आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी आणि दक्षिण सिनेसृष्टीत चांगलं काम केलं आहे. रजनीकांत यांना तिकडची भाषा कशी समजत असेल ते मलाही काही कळत नाही. आता सयाजी शिंदे आहे, ते सुद्धा तिथे काम करताय, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
#WATCH | Actor Sayaji Shinde joins NCP in the presence of Maharashtra Deputy CM Ajit Pawar and other senior NCP leaders in Mumbai. pic.twitter.com/u9F2amjJLE
— ANI (@ANI) October 11, 2024
सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक- अजित पवार
पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. त्यानंतर ते बोलताना म्हणाले की, मी तेच म्हणतोय उभं नका करू उभं नका करू तरी देखील मला उभं करतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराईसाठी चांगल काम करत आहेत. सिद्धिविनायक आणि दगडूशेठला सर्वजण जात असतात. साईबाबाला जातात. तिथं प्रसाद म्हणून रोपट दिलं तर देवाचा प्रसाद म्हणून ते चांगल वाढवल जाईल, अशी संकल्पना त्यांनी मांडली. तर सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, असा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला.












Click it and Unblock the Notifications